पॉलिटेक्निकच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात.

WhatsApp


नारायणगांव (प्रतिनिधी ) राज्यातील शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित तंत्रनिकेतनांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथम वर्षाच्या १० वी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने नुकतेच जाहीर केले आहे. इच्छुक विद्यार्थी २० मे ते १६ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील. कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीखही १६ जून आहे. प्रवेश अर्ज भरल्याची आणि कागदपत्र पडताळणीची अंतिम नोंदही १६ जूनपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर १८ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, १९ ते २१ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना आपली हरकत नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या सुविधा केंद्रावर संपर्क साधावा. यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे १. शाळा सोडल्याच्या दाखला २. दहावीचे गुणपत्रक ३. अधिवास व राष्ट्रियत्व प्रमाणपत्र ४. उत्पन्नाचा दाखला.
मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इलेक्टॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, केमिकल इंजिनिअरींग, इन्फॉरेमेशन टेक्नॉलॉजी अशा अनेक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया केंद्रिभुत पध्दतीने राबविली जाते.
तंत्रनिकेतन पदविका प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (DTE, Mumbai) राबविला जातो. जुन्नर तालुक्यात जयहिंद पॉलीटेक्निक हे अधिकृत सुविधा केंद्र(Facilitation Centre D-6418) आहे.

जाहिरात

error: Content is protected !!