जयहिंद मध्ये सायबर सिक्युरीटी संबंधीचे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन.

WhatsApp


नारायणगांव :(प्रतिनिधी) कुरण जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सद्यस्थिती बाबतचे दोन-दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दिनांक ०७ आणि ०८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत “सायबर सिक्युरिटी अॅवेयरनेस अँड हँड्स-ऑन वर्कशॉप”. यावेळी OWASP स्टुडंट चॅप्टर आणि सायबर सेंटिनल क्लब या दोन विद्यार्थी संघटनांच्या उद्घाटन करण्यात आले. यामुले संस्थेने डिजिटल सुरक्षा शिक्षणात नवीन अध्याय सुरू केला आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरचे तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे तसेच त्यामध्ये आपले योगदान देणे शक्य होणार असल्याची माहिती जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी दिली.
अमेरिकेतील अग्रगण्य सायबर सुरक्षा कंपनी “HackerOne”* चे वरिष्ठ तज्ञ श्रीमंत मोरे आणि पवन तांबे यांनी व्यावहारिक सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना नैतिक हॅकिंग, नेटवर्क सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंध यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्रायोजक म्हणून HackerOne या कंपनीने ३०० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹२५,०००) ची आर्थिक मदत पुरवून संस्थेच्या प्रयत्नांना जागतिक मान्यता दिली. या कार्यशाळेत २२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सायबर धोक्यांचे वास्तविक जगातील सिम्युलेशन्स, सुरक्षा साधनांचा वापर आणि संधी रोधकतंत्रे अवगत करून घेतली. श्रीमंत मोरे यांनी दाखवलेल्या लाइव्ह हैकिंग डेमोने सायबर धोक्यांची वास्तवता समजली.
या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते पार पडले. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सायबर साक्षरतेची गरज असून विद्यार्थ्यांनी नैतिक तंत्रज्ञानवादी व्हावे असे आवाहन केले.
संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांनी स्त्री सक्षमीकरणासाठी सायबर सुरक्षा कौशल्ये गरजेची असल्याचे नमुद केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, संगणक विभागप्रमुख डॉ. आनंद खत्री हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी संगणक विभागाचे प्राध्यापक अभिषेक बांगर यांनी प्रयत्न केले. त्यांनी HackerOne च्या तज्ज्ञांना व प्रायोजकांना विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पार्थ पाटील याने काम पाहिले.

जाहिरात

error: Content is protected !!