कुकडी प्रकल्पात अवघा 16 टक्के पाणीसाठा शिल्लक. शेतीला उन्हाळ्यात पाणी मिळणार का? शेतकऱ्यांना चिंता

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) वर्षी उन्हाळा कडक असल्याने व त्यातच पाण्याचे बाष्पीभवनही अधिकचे होत राहिल्याने कुकडी प्रकल्पात आजच्या तारखेला(दि. 14) पाण्याचा साठा अवघा 16..28% इतकाच असून अर्धा एप्रिल व मे आणि जून महिन्यात उन्हाळ्यामध्ये एवढे पाणी शेतीला आणि पिण्यासाठी पुरेल का?  याबाबत मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे.  मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पामध्ये 18.85% पाण्याचा साठा व शिल्लक होता.  कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणामध्ये 24.10 % पाण्याचा साठा शिल्लक असून मागील वर्षी 19.92% इतका पाण्याचा साठा शिल्लक होता.माणिकडोह धरणामध्ये अवघे 6.28% इतके पाणी असून मागील वर्षी आजच्या तारखेला 4.58% इतके अत्यल्प पाणी या धरणामध्ये शिल्लक होते. वडज धरणामध्ये 31.98% एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे. तर मागील वर्षी आजच्या तारखेला येडगाव धरणामध्ये 31.4% इतके पाणी शिल्लक होते.पिंपळगाव जोगा धरणामध्ये 14.07% इतका पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी या धरणामध्ये 19.84% इतके पाणी शिल्लक होते. डिंभे धरणामध्ये आजच्या तारखेला 22.95% पाणी असून मागील वर्षी डिंभे धरणामध्ये 28.83% इतके पाणी शिल्लक होते.  चिल्हेवाडी धरण फक्त जुन्नर तालुक्यासाठीच असून या धरणातील पाणी जुन्नर तालुक्यासाठी वापरले जाते. सध्या या धरणामध्ये धरणामध्ये 22.99% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. मागील वर्षी या धरणामध्ये आजच्या तारखेला 20.70% इतका पाण्याचा साठा शिल्लक होता. तसेच शेतीसाठी देखील मोठ्या प्रमाणात धरणांमधून पाण्याचा उपसा होतोय.     दरम्यान यंदाच्या वर्षी उन्हाळा अधिक कडक असल्याने पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा देखील कमी होताना दिसतोय. मे महिन्यामध्ये कदाचित पूर्व भागातील तालुक्यांसाठी पिण्यासाठी पाणी सोडावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी शिल्लक राहील का? याबाबतची काळजी वाटत आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये येडगाव धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्यासाठी कृषी पंपांचे विद्युत कनेक्शन तोडले होते. परंतु त्यावेळी आमदार अतुल बेनके यांनी तातडीने पुन्हा कृषी कनेक्शन जोडून देण्यास संबंधित विभागाला भाग पाडले होते. तथापि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणतात की, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुकडी प्रकल्पात पाण्याचा साठा योग्य प्रमाणात असून पाऊस पडेपर्यंत पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही. जनतेने काळजी करू नये.      दरम्यान येडगाव धरणाच्या आजूबाजूचे शेतकरी या पाण्याच्या भरवशावर दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करीत असतात. यंदा सुद्धा या भागामध्ये अधिकची टोमॅटोची लागवड झाली असून जर या टोमॅटोला उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही तर मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. येडगाव धरणाच्या पाण्याच्या साठा कमी झाल्याने शेतकऱ्यांना आपले कृषी पंप अधिकचे पाईप टाकून व केबल वाढवून पुढच्या भागात मोटारी ढकलाव्या  लागत आहेत.                       @ फोटो खालील ओळ- येडगाव धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने शेतकऱ्यांना कृषी पंप पुढे ढकलण्याची पाळी( छाया सुरेश वाणी)

जाहिरात

error: Content is protected !!