नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील सन्मित्र पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली.या सभेत आठ टक्के लाभांश देण्याचे ठरले असून उर्वरित पाच टक्के रक्कम गावचे प्रवेशद्वार बांधण्यासाठी खर्च करण्याचे ठरले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक भाऊ यांनी दिली. सन्मित्र पतसंस्थेची सभासद संख्या ११२५ असून अधिकृत भाग भांडवल २० कोटी रुपये आहे.एकूण निधी १ कोटी ६९ लाख ३६ हजार ७४९ रुपये आहे.संस्थेची गुंतवणूक ७ कोटी ४८ लाख ८८ हजार ८७६ रुपये आहे.खेळते भाग भांडवल २१ कोटी ५७ लाख ५९ हजार ७९५ रुपये आहे.संस्थेला निव्वळ नफा २९ लाख ४५ हजार ३६३ रुपये झाला आहे.सन्मित्र पतसंस्थेला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत असून रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरविण्याचे संस्थेने ठरविले आहे. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक विलास कदम, अध्यक्ष अशोक भोर, उपाध्यक्ष सुधीर खोकराळे, संचालक आदिनाथ बारवे, दत्तानाना भोर, डॉ.संतोष वायाळ, डॉ.प्रवीण शिंदे, शरद खोकराळे, भालचंद्र खोकराळे, राजेंद्र रणदिवे, संतोष शिंदे, निर्मला खोकराळे, नयना थोरात, निलकश भोर, सल्लागार बाळू खंडागळे, नितीन भोर, हनुमंत शिंदे, शब्बीर पठाण, जयेश खोकराळे, व्यवस्थापक राजेंद्र भोर, वसुली अधिकारी निलेश शिंदे, चैतन्य भोर, गिरीश खोकराळे, सुनील तपासे, कोमल कदम उपस्थित होते.या वार्षिक सभेसाठी शिवदास खोकराळे, भरत भोर, बाबाजी शिंदे, प्रभाकर भोर, विजय खोकराळे, दत्तू खोकराळे, मारुती खोकराळे, संतोष खोकराळे, किसन खोकराळे, अधिकराव जाधव, दिलीप भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास कदम यांनी केले, आभार दत्तानाना भोर यांनी मानले. @ फोटो खालील ओळ- हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे सन्मित्र पतसंस्थेची वार्षिक सभा पार पडली.(छाया – सुरेश वाणी )