सिमेंटची जंगलं वाढली आणि बिबट्याला उसाची लपण झाली. त्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढले- वनमंत्री गणेश नाईक

WhatsApp

नारायणगाव ( प्रतिनिधी )जंगलतोड झाल्याने व सिमेंटची जंगलं वाढल्याने तसेच ऊस लागवडचे क्षेत्र वाढू लागल्याने बिबट्या आता उसात वास्तव्य करू लागला आहे. त्याला शिकार उपलब्ध होत नाही म्हणून तो माणसांवर हल्ले करतोय. बिबट मानव संघर्ष वाढू लागल्याने वनखात्याने पकडलेले बिबटे गुजरात व दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पाठवले जाणार आहेत तसेच तात्काळ एक हजार पिंजरे घेण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली
वनमंत्री गणेश नाईक हे बेल्हे (तालुका जुन्नर) येथे एका खाजगी कार्यक्रमाला आले असता ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बिबट्याचं संकट हे जुन्नर आंबेगाव शिरूर एवढ्यापुरत्याच सीमित राहिले नाही आता बिबट्या ची समस्या महाराष्ट्रभर होऊ लागली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात देखील बिबट्याचे हल्ल्याने अनेकांचे बळी गेले आहेत.
बिबट्याचं संकट मोठा आहे त्या संदर्भात केंद्रीय कायदे किचकट आहेत परंतु माणसाचा जीव देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करता येईल याबाबत सुद्धा सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न आहेत. त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर उपाययोजना सुरू केले असून जुन्नर व शिरूर तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा अधिकचा उपद्रव वाढल्याने पुणे जिल्ह्यासाठी 1000 पिंजरे तातडीने खरेदी करण्यात यावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, यापुढे पकडलेले बिबटे सोडून न देता हे बिबटे गुजरात येथील वनतारा येथे पाठवण्यात येणार आहेत. वनताराचे टीम माणिक डोळे येथील निवारा केंद्रावर आली आहे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा बिबट्यांची मागणी असून केंद्र सरकारच्या मदतीने तिकडे सुद्धा बिबटे पाठवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू होणार नाही याबाबतची खबरदारी वन खात्याकडून घेतली जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान जुन्नर तालुक्यात मध्ये सातशे ते आठशे रुपये असावेत असा वनखात्याच्या अधिकाऱ्यांचा अहवाल असला तरी प्रत्यक्षात मात्र दीड ते दोन हजार रुपये असावेत असा अंदाज खुद्द वन मंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला. शासनाकडून बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीला 25 लाख रुपयांचे अर्क सहाय्य केले जातात परंतु हे 25 लाख रुपये दिल्यावर माणूस काही परत जिवंत होऊ शकत नाही त्यामुळे यापुढे मानवावर बिबट्याचा हल्ला होणार नाही याबाबतचे प्रक्षेता घेण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून बिबटे पकडण्याबाबत तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!