ओम साई राम शिक्षक प्रतिष्ठान व डिसेंट फाउंडेशन तर्फे नारायणगावात महाआरोग्य शिबिर संपन्न.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव व डिसेंट फाउंडेशन पुणे तर्फे नारायणगावात महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी वारूळवाडीचे नवनियुक्त सरपंच विनायक भुजबळ,डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई,नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस उपनिरीक्षक दडस पाटील,वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ,डोके हॉस्पिटलचे डॉ.अमेय डोके,श्री हॉस्पिटल आळेफाट्याचे डॉ. सचिन शिंदे,डॉ.पंकज वाव्हळ,डॉ.कांचन शिंदे,एफ. बी. आत्तार, आदिनाथ चव्हाण,रोटरी क्लब अध्यक्ष हेमंत महाजन,ॲड.अरुण गाडेकर,महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जुन्नर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रविंद्र वाजगे, अर्थसंपदा पतसंस्थेचे संचालक शरदराव शिंदे,जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे सचिव अंबादास वामन,माजी उपसभापती अविनाश शिंगोटे,संचालक सचिन मुळे,वारूळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश मेहेर,रियाज मोमीन,मनोहर वायकर,साईनाथ कनिंगध्वज,शांताराम डोंगरे, हेमलता राजगुरू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबीरात ईसीजी तपासणी,बीपी शुगर तपासणी,दंत तपासणी,ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी,ब्लड तपासणी आदि विविध तपासण्या करण्यात आल्या.या महाआरोग्य शिबिरात अनेक शिक्षक बंधू भगिनींनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी केले.सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे खजिनदार विजय नागरे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन शामराव बटवाल,बाळासाहेब राजगुरू,मिलिंद औटी,बबनराव सानप,सतिश वाव्हळ,दत्ता हांडे,भानुदास बटवाल,गणेश बिडवई,रंगनाथ पवार,कमलाकांत मुंढे,ज्ञानेश्वर शिर्के आदींनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!