आमदार दिलीप वळसे पाटील यांचे शेतकरी बांधवांना आवाहन. पाण्याचा वापर जपून करा.

WhatsApp

मंचर (प्रतिनिधी )

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात कडक असून कुकडी प्रकल्पामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.आज (4)मंचर मधील शरद सहकारी बँक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अहिल्यानगर या ठिकाणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जुन्नर आंबेगाव तालुक्यातील बंधारे व कालव्यामध्ये पाणी सोडा या बाबतची मागणी करणार असल्याचे सांगितले तसेच याबाबतचे पत्र देखील संबंधित मंत्र्यांना एप्रिल महिन्यामध्ये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आपल्या डिंभे धरणाच्या घोड कालव्याला दि. ५ मे रोजी पाणी सुटणार आहे. त्याचबरोबर घोड नदीवरील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना देखील पाणी सुटले पाहिजे, अशी प्रमुख मागणी आपण अहिल्यानगर येथे होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडणार आहोत, अशी माहिती दिली.

आपण पाणी वाटपात राजकारण कधी केले नाही, शेतकऱ्यांना पाणी कमी पडू दिले नाही, तक्रार येऊ दिली नाही. प्रकाश झोतात राहण्यापेक्षा आपण नेहमी काम करत आलोय व काम करत राहणार, अशी ग्वाही दिली. तसेच भविष्यात पाण्यावरून मोठा संघर्ष उभा राहणार आहे, यासाठी शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरले पाहिजे. सध्या प्रचंड उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन झपाट्याने धरणातील साठा कमी होत आहे. डिंभे धरणात सध्या फक्त 13 टक्के पाणी शिल्लक असून हे पाणी पुरवण्याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. दि. 13 एप्रिल रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहून घोड व मीना कालव्याला आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांना पाणी सोडण्याची मागणी यापूर्वीच आपण केली आहे.

कालव्याला पाणी सोडण्यासंदर्भात अहिल्यानगर येथे सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत कालव्याबरोबर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी सोडले जावे, ही प्रामुख्याने मागणी मांडणार असल्याची माहिती आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली . काही ठिकाणी शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याबरोबरच शेतीच्या पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माझे या बैठकीत प्रयत्न राहतील असेही यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पत्रकार परिषदेला भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राजेंद्र गावडे, दादाभाऊ शेठ पोखरकर, प्रकाश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!