निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत देवराम लांडे यांचे 12 पैकी 12 उमेदवार विजयी

पश्चिम आदिवासी विभागात महत्त्वाची व सर्वात मोठी मानली जाणारी निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 2025 ते 2030 नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये देवराम लांडे यांच्या पॅनलने 12 पैकी 12 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे निवडून आलेले सर्व उमेदवार हे बहुमताने निवडून आले आहेत या सहकार निवडणुकीच्या निमित्ताने देवराम लांडे यांचा पश्चिम भागात असणारा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे जुन्नर तालुक्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी या निवडणुकीत देवराम लांडे यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली परंतु लांडे यांनी वादळी झेप घेत जोरदार मुसंडी या निवडणुकीत मारली आहे यानिमित्ताने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत देवराम लांडे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा राहील असे दिसून येत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!