चैतन्य कांबळे यांची ओतूर येथे वनक्षेत्रपाल पदावर नियुक्ती.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) अडीच महिन्यापासून रिक्त अससेल्या वनविभागाच्या ओतूर वनक्षेत्रपाल पदावर चैतन्य सिताराम कांबळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. याबाबतचे लेखी आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपसचिव भगवान सावंत यांनी काढले आहे.  ओतूर येथे लहू ठोकळ हे वनक्षेत्रपाल म्हणून काम पाहत होते, परंतु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अडीच महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. जुन्नर या ठिकाणी वनक्षेत्रपाल म्हणून काम पाहत असलेले प्रदीप चव्हाण यांच्याकडे ओतूरचा चार्ज देण्यात आला होता. तालुक्यात बिबट्याचे हल्ले पाळीव प्राणी व मानवावर अधिक होत असल्याने एका अधिकाऱ्यावर कामाचा ताण येत होता.   

    दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांनी ही बाब चार दिवसांपूर्वी वन मंत्री गणेश नाईक यांच्या निदर्शनात आणून दिली होती. वनमंत्र्यांनी तात्काळ पुणे जिल्ह्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना याबाबतचा अहवाल तात्काळ देण्याच्या सूचना केल्या होत्या. ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर वनमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने शासनाने चैतन्य कांबळे यांची वनक्षेत्रपाल म्हणून ओतूर या ठिकाणी नियुक्ती केली आहे. कांबळे यांनी यापूर्वी ओतूर या ठिकाणी वनपाल म्हणून काम केले आहे त्यांना या परिसराची पूर्ण माहिती असल्याने शेतकरी व वन विभाग यांच्यात योग्य प्रकारे सुसंवाद राहण्यास मदत होणार आहे.दरम्यान जुन्नर परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले मानवावर व पाळीव प्राण्यांवर वारंवार होत असल्याने कांबळे यांना तात्काळ ओतूर येथे रुजू होण्याचे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!