विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात शेतात राहत असलेल्या राजेंद्र सिताराम कोरडे यांच्या घराच्या दरवाजावर दोन मोठे दगड टाकून घरात प्रवेश करून घरातील महिलांना कोयत्याच्या व धारदार शस्त्राचा धाक दाखवून व तिघांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील व कपाटातील पंधरा तोळे – चांदीचे सुमारे 25 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. घटना रविवारी (ता. 22)मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या टीमने या दरोडेखोरांचा शोध सुरू केला असेल लवकरच त्यांना बेड्या ठोकू अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. ठसे तज्ञ देखील घटनास्थळी भेट देऊन ठसे घेतले आहेत. याबाबतची समजलेली माहिती अशी की, राजेंद्र सिताराम कोरडे व त्यांचा मुलगा नितीन राजेंद्र कोरडे हे बोरी बु ll (ता. जुन्नर ) यथील कोरडेमळा येथे आपल्या शेतामध्ये घर बांधून कुटुंबासमवेतराहतआहेत. घटना घडली त्या दिवशी घरामध्ये राजेंद्र कोरडे त्यांचा मुलगा नितीन तसेच त्यांची पत्नी हिराबाई, सून धनश्री,मुलगी दिपाली नातू कृष्णा व नात आरोही व दुसरी नात अन्वी व ओवी एवढे घरामध्ये होते. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या दरोडेखोरांनी घराच्या दोन्ही दरवाजावर दोन मोठे दगड दगड टाकून घराचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. कुणीही आवाज करायचा नाही असे म्हणत सगळ्यांना दमदाटी केली. तू एका कोपऱ्यात बसले बसवले तसेच कोयत्याचा धाक दाखवून घरातील लाईट लावण्यास भाग पाडले. अंगावरील सगळे दागिने काढून द्या व कपाटामध्ये कुठे दागिने आहेत ते दाखवा असे म्हणून धमकवण्यास सुरुवात केली. तसेच घरातील राजेंद्र कोरडे नितीन कोरडे व मुलगी दिपाली घनवट यांना मारहाण केली. महिला व मुलांच्या अंगावरील दागिने दरोडेखोरांनी ओरबडून घेतले. घरातील सगळे साहित्य, कपडे अस्तव्यस्त करून लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. कपाटात असलेलेदागिने तसेच महिलांच्या व मुलांच्या अंगावर असलेले असे एकूण 15 तोळे वजनाचे दागिने लंपास केले.नातू कृष्णा याच्या कानातील एक सोन्याचा डूल काढून नेला. कृष्णाच्या आईने चोरट्यांना प्रतिकार केल्याने दुसरा डूल चोरट्यांना काढता आला नाही. हे दरोडेखोर मराठीमध्ये बोलत होते दरम्यान हे दरोडेखोर वीस मिनिटे घरामध्ये होते. चार दरोडेखोर घरात थांबले व चार जण घराच्या बाहेर थांबले. बाजूला असलेल्या घराला बाहेरून कड्या घातल्या दरम्यान दरवाजावर दगडी टाकल्यानंतर या दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून घरातील माणसांना लाईट लावण्यास भाग पाडले. व सगळ्यांना सोन्याचे दागिने कुठे आहेत ते दाखवा व अंगावरचे दागिने काढून द्या असे धमकवण्यास सुरुवात केली. साखर झोपेमध्ये असलेल्या सगळी लोकं अचानक घडलेल्या घटनेमुळे घाबरून गेले होते. महिला व मुलांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबडून घेतले. दरम्यान घरातील सगळे दागिने घेतल्यानंतर या दरोडेखोरांनी सगळ्यांचे मोबाईल काढून घेऊन बाहेरच्या ओट्यावर ठेवले तसेच घराला बाहेरून कडी लावली. दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यावर परत जात असताना त्यांना बोरी – बेल्हे रस्त्याला संजय शिवाजी कोरडे हे शेतकरी शेतामध्ये पाणी भरायला जात असताना दिसले. त्याला अडवले व त्याचा खिशातील मोबाईल काढून घेऊन सिम कार्ड त्याला दिले व मोबाईल घेऊन गेले. या घटनेमुळे कोरडे कुटुंबातील सर्व सदस्य पूर्णपणे घाबरून गेले आहेत. दरम्यान घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आजूबाजूला या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा शोध लागला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली आहे. तसेच असे ठसे तज्ञ देखील दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणचे ठसे घेतले आहेत. दरम्यान जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांना या गुन्ह्याचा तातडीने शोध लावा व रात्रीचे गस्त वाढवा अशा सूचना दिल्या. बोरी परिसरामध्ये या घटनेमुळे भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. @फोटो खालील ओळ – बोरी बुद्रुक येथील राजेंद्र कोरडे यांच्या घराच्या दरवाजावर दोन मोठे दगड टाकून घरावर दरोडा टाकून दागिने लंपास केले. ( छाया- सुरेश वाणी )