नारायणगाव :(प्रतिनिधी )
सालाबादप्रमाणे याही वर्षी मौजे देवळे (चिंचेचीवाडी )या ठिकाणी गेली 14 वर्षे आपल्या आई वडिलांची पुण्यतिथी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार बोलवून आपल्या भागातील लोकांना चांगले प्रभोधन उपलब्ध करून देण्याचे काम देवळे गावातील बोऱ्हाडे कुटुंब सातत्याने करत आहे श्री. रोहिदास धोंडू बोऱ्हाडे व त्यांच्या पत्नी सौ. सुनीताताई रोहिदास बोऱ्हाडे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात चांगल काम करत आहेत
त्यांनी आयोजित केलेल्या आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथी सोहळयास शेकडो वारकरी बांधवांच्या व ग्रामस्थ बंधु भगिनीच्या उपस्थितीत ह. भ. प.संगीत अलंकार श्री.श्रावण महाराज सुपे यांच सुश्राव्य कीर्तन पार पडले
संयुक्त पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने उपस्थित मान्यवर जुन्नर तालुक्याचे मा. आमदार अतुल दादा बेनके, भाऊ साहेब देवाडे, मारुती शेठ वायळ,ऍड सचिन चव्हाण, राजु शेठ डुंबरे, गणेश कोल्हाळ, सुशील मडके, रामदास कोकणे मा.सरपंच आजिंक्य घोलप मा. सरपंच हरिमामा मुकणे, मा. सरपंच रामा भालचिम,मा. सरपंच अशोक गाभाले काशिनाथ साबळे आदि मान्यवर उपस्थित होते