नारायणगाव : प्रतिनिधी)
दहावीच्या परीक्षेत ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलचा १००% निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्य हितेश शर्मा यांनी दिली.
मंगळवार दिनांक १३ में २०२५ रोजी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेच्या१००% निकालाची परंपरा कायम जपली आहे.
शाळेतील प्रथम पाच विद्यार्थी. १) सानवी आकाशा आवारी ९६.८०
२) मुटके वैष्णवी संदीप ९६.४०
३) सुपेकर निल सतीश ९५.८०
४) खोकराळे तनिष्क रामदास ९५.६०
५) बोकरिया जितल समीर ९५.२०
५) सिद्धी अजीतकुमार दाते ९५.२०
असे प्राप्त गुण आहेत.
परीक्षेला बसलेल्या ४४ विद्यार्थ्यांपैकी:
१५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत
१३ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत
७ विद्यार्थ्यांनी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत
६ विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत
३ विद्यार्थ्यांनी ५०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत
“यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते: पुढे चालू ठेवण्याचे धाडस महत्त्वाचे असते.”
चला उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत राहूया आणि आपली शाळा अधिक उजळवूया! अशा हार्दिक शुभेच्छा देत संस्थेचे प्राचार्य,डॉ. हितेश शर्मा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा वैयक्तिक फोनद्वारे अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन उत्तम निकाल साध्य केला असे मत व्यक्त केले.
हा दिमाखदार निकाल हे या संस्थेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे समर्पण व पालकांचे आशीर्वाद व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असून आम्हा सर्वांना अभिमान व आनंद आहे,असे गौरीताई बेनके यांनी सांगितले. माजीआमदार अतुल बेनके यांनी शाळेचे परिश्रम खरोखरच प्रेरणादायी आहेत.विद्यार्थ्यांना शाब्बासकी देत असेच सातत्यपूर्ण प्रयत्न दृढ निश्चयाचे परिणाम साधत जिद्दीने अध्ययनात उत्कृष्ट प्रगती करत राहा.असे मागदर्शन केले.
. एग्नेस मॅडम ह्यांनी परीक्षेअगोदर केलेल्या तुमच्या सर्व मेहनतीला योग्य असा गुणरूपी पुरस्कार मिळाला असे मत व्यक्त केले.शाळेतील सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.