धनगरवाडी येथील शशिकांत सोनवणे यांच्या उसाच्या तोडणीसुरु असलेल्या शेतात बिबट्याची पिल्ले व मादी आढळल्याने मजुरात घबराट.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी)  धनगरवाडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी शशिकांत भिमाजी सोनवणे यांच्या उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व चार पिल्ले आढळल्याने ऊस तोडणी मजुरांची घबराट झाली. तातडीने ही माहिती त्यांनी वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांना दिल्याने त्यांनी टीम घटनास्थळी पाठवू थर्मल ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्या व त्याची पिल्ले आहेत काय? याबाबतची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावला आहे.      

 जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशिकांत भिमाजी सोनवणे यांच्या ऊसाची तोडणी धनगरवाडी गावचे हद्दीमध्ये भीमाशंकर साखर कारखान्याचे मजूर करीत असताना शनिवार (दि. 8) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उसाच्या शेतामध्ये चार बिबट्याचे बछडे दिसून आले. हे बछडे व त्यांची आई उसाच्या प्लॉटमध्ये आतमध्ये पळून गेली. हा सगळा प्रकार पाहून ऊस तोडणी मजूर घाबरून उसाच्या प्लॉटच्या बाहेर आले व त्यांनी ऊस मालक शशिकांत सोनवणे यांना फोन केला.     घटनेचे गांभीर्य ओळखून शशिकांत सोनवणे यांनी वनविभागाला याबाबतची खबर दिली व स्वतः तात्काळ उसाच्या प्लॉटवर दाखल झाले. वनविभागाच्या टीमने थर्मल ड्रोन कॅमेराने बिबट्याची पिल्ले व बिबट्याची मादीची पाहणी केली तसेच बिबट्याच्या पायांचे ठसे उसाच्या क्षेत्रात आढळल्याने वनविभागाने रविवार (दि.9) रोजी ऊस तोडणी सुरू असलेल्या प्लॉटमध्ये पिंजरा लावला आहे.    दरम्यान शशिकांत भिमाजी सोनवणे यांच्या शेतावरील घराचे परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यामध्ये बिबट्याची मादी व चार पिले या परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे वनविभागाने विशेष खबरदारी घेतली असून ऊस तोडणी मजुरांना देखील उसाची तोडणी करताना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!