प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार प्रदान

WhatsApp

नारायणगाव : प्रतिनिधी
सुरलथानी राजाभात युनिव्हर्सिटी सुरलथानी, थायलंड, फोर्नाखोन राजाभात युनिव्हर्सिटी बँकॉक, थायलंड, आणि ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम पुणे यांच्या वतीने प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांना “इंडो-थायी एज्युकेशनल एक्सलन्स अवॉर्ड-२०२६” ने ॲम्बेसेडॉर हॉटेल बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत मा.रोजनासाकदी संगथाश्रीविलाई प्रेसिडेंट इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ जर्नालिस्ट अँड मेडिया असोसिएशन, बँकॉक, थायलंड, प्रा.डॉ.अरुण चैनीत, विभाग-प्रमुख, लोकप्रशासन फोर्नाखोन राजाभात युनिव्हर्सिटी बँकॉक, प्रा.डॉ.प्रकाश दिवाकरण, कुलगुरू हिमालयन युनिव्हर्सिटी, अरुणाचल प्रदेश आणि मिसेस आशागन अॅशघारी, चेअरमन, फोनिक्स ग्लोबल गोल्ड कंपनी लि. बँकॉक थायलंड यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांना हा शैक्षणिक पुरस्कार त्यांच्या उच्च शिक्षणातील संशोधन आणि शैक्षणिक कार्याबद्दल “औटस्टँडिंग शैक्षणिक लिडरशीप अँड कोओर्डीनेशन” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा.डॉ.जे.पी.भोसले हे ग्रामोन्नती मंडळाचे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नारायणगाव, पुणे येथे वाणिज्य, व्यवस्थापन, अकाउंटन्सी विषयाचे प्राध्यापक व वाणिज्य संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत सिंगापूर, मलेशिया, दुबई, शारजा, आबुदाबी, श्रीलंका, नेपाळ, बँकॉक थायलंड येथील विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक परिषदांमध्ये बीज भाषणे दिली आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून परदेशी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाची ८३ संदर्भ व क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे १२५ संशोधक निबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी २१ पीएच.डी. व २० एम.फील. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे. नारायणगाव महाविद्यालयातही त्यांनी आत्तापर्यंत १० आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदा आयोजित केल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ते वाणिज्य, अकाउंटन्सी आणि व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक, उत्तम संशोधक व व्याख्याते म्हणून ओळखले जातात.
प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांनी आत्तापर्यंत श्रीलंका, दुबई, शारजा, बँकॉक-थायलंड, सिंगापूर, काटमांडू-नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदांमधून बीज भाषणे, कॉन्फरन्स उद्घाटनपर भाषणे, मुख्य भाषणे दिलेली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमधून १२५ शोध-निबंधाचे सादरीकरण केलेले आहे. त्यांच्या नावावर ४ भारतीय पेटंट आहेत.
या पुरस्काराबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्री.प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न श्री.अनिल मेहेर, अध्यक्ष श्री.सुजित खैरे, कार्यवाह श्री.रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह श्री.अरविंद मेहेर, प्राचार्य ए.बी.कुलकर्णी, भोसले हॉस्पिटलचे सर्जन डॉ.हनुमंत भोसले, डॉ.रविंद्र गिरी, डॉ.रामदास उदमले, डॉ.अमोल डुंबरे आदींनी प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रा.डॉ.जे.पी.भोसले यांचे समाजातील सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.

जाहिरात

error: Content is protected !!