घोडेगाव (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा विद्यमान आमदार, सन्माननीय दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांनी भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत केलेल्या मागणीची राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली आहे. वळसे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.
जुन्नर-घोडेगाव-तळेघर-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ वर आणि भीमाशंकर-वाडा-खेदा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५५० वर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविक आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी साहेब.मारुती लोहकरे. शामराव बांबळे. निवृत्ती गवारी. संतोष राक्षे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले.
या गंभीर समस्येची दखल घेत, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला पत्र लिहून भीमाशंकर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर सकारात्मक प्रतिसाद देत, खड्डे बुजवण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे यांनी वळसे पाटील यांना दिलेल्या पत्रात (दि. २०.०७.२०२५ रोजीचे पत्र क्रमांक रा.म.वि./पुणे/३/२१९८/२०२५), भीमाशंकर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ उपाययोजना केली जाईल आणि या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे नमूद केले आहे.
मा. वळसे पाटील हे आपल्या मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात आणि “काम करत आलो, काम करत राहू” या उक्तीप्रमाणे ते सातत्याने कार्यरत आहेत. भीमाशंकर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे स्थानिकांना तसेच भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.