नारायणगाव : (प्रतिनिधी )बारव जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून या गटामध्ये मायी लांडे विरुद्ध सुनीता बोऱ्हाडे असा सामना होण्याची शक्यता असून या दोन्हीही महिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तथापि मायी लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले तर आम्ही त्यांच्या विरोधात काम करू असं इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मायी लांडे यांचे सासरे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घेऊन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नारायणगाव येथे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर सुनीता बोऱ्हाडे यादेखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यां आहेत. तथापि या दोघीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. जर माई लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या तर सुनीता बोऱ्हाडे शिवसेनेतच थांबणार. व शिवसेनेकडून निवडणूक लढवणार ह्या दोघींचा सामना समोरासमोर होणार आहे. दरम्यान दोघींनाही एकाच पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे समजते. एवढेच नाही तर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी त्यांचे बोलणे झाले असल्याचेही माहिती मिळत आहे. माई लांडे यांचे सासरे देवराम लांडे यांनी माजी आमदार अतुल बेनके यांचे विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे अतुल बेनके यांचा पराभव झाला. तसेच पक्षाची बेइमानी करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये अशी मागणी आहे. दरम्यान देवराम लांडे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी माई शिवसेनेत प्रवेश केलेला नव्हता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आहेत असाही दावा लांडे समर्थक कार्यकर्ते करीत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते म्हणत आहेत की सुनीता बोराडे यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी असा सूर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या देवराम लांडे यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तर आम्ही सगळे सुनीता यांचे जाहीर काम करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिला आहे. दरम्यान देवराम लांडे यांच्या माध्यमातून बारव जिल्हा परिषद गटामध्ये अनेक कामे मार्गे लागले आहेत त्या पुण्याच्या जोरावर माळी लांडे विजय होतील असा दावा केला जात आहे. तसेच सुनीता बोराडे यांनी देखील मागील पाच वर्षात जनतेशी विचारांची नाळ जपून ठेवली आहे त्यामुळे या गटात कोणी कुठल्याही पक्षात गेलं तरी अरे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारणार असा दावा स्थानिक कार्यकर्ते करीत आहेत