नारायणगाव : ( प्रतिनिधी) जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची विधिवत पूजा करून व्यापारी व शेतकरी यांना खिचडी व केळी या उपवासाच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उपसचिव शरद घोंगडे व त्यांच्या पत्नी रश्मी घोंगडे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली. सभापती संजय काळे यांच्या हस्ते महारती करण्यात आली. यावेळी सारंग घोलप, निवृत्ती काळे, जनार्दन मरभळ, तुषार थोरात, पांडुरंग गाडगे, आरती वारुळे, धनेश संचेती,नाना घोडे, तसेच व्यापारी गणेश फुलसुंदर, धोंडीभाऊ नेहरकर,पप्पू थोरात, योगेश घोलप, भूषण घोलप, जालिंदर डुकरे, सतीश भोर अशोक दांगट, अमित दांगट, संदीप जाधव आदी उपस्थित होते. टोमॅटो उत्पादक शेतकरी व कामगार यावेळी अधिक संख्येने हजर होते. यावेळी बोलताना सभापती संजय काळे म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये नारायणगावची टोमॅटो मार्केट दुसऱ्या क्रमांकाची आहे याचा मला निश्चित अभिमान असून हे सगळं शेतकरी बांधव आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या टोमॅटोला व तरकरी भाजीपाल्याला चांगला बाजार भाव द्यावा असे सूचना यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना केली. तसेच शेतकऱ्यांनी टोमॅटो निवडून 22 किलोचे क्रेट भरून आणावे की जेणेकरून अधिकचा बाजारभाव मिळू शकेल. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे. लवकरच धना मेथीचा लिलाव नवीन जागेत घेतला जाणार आहे. व नारायणगावच्या टोमॅटो टोमॅटो मार्केटमध्ये मोठा सेल हॉल बांधण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही. यावेळी तुषार थोरात, आरती वारुळे यांनीही शेतकरी व व्यापारी यांना मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी 200 किलोची खिचडी व केळी व चहाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीभाऊ नेरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक सारण घोलप यांनी मानले.