नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे वडील स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
सकाळी ९.१५ वाजता ७० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा थोरात कुटुंबियांच्या वतीने पोशाख देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांचे कीर्तन होणार आहे दुपारी साडेबारा वाजता स्वर्गीय नारायण थोरात यांचे स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे.याप्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे, हिंगोलीचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर, आमदार शरददादा सोनवणे आमदार बाबाजी काळे, आमदार आमशा पाडवी,आमदार मंजुळा गावीत आमदार हेमंत पाटील माजी खासदार शिवाजी माने,शिवाजीराव आढळराव पाटील चेअरमन सत्यशीलदादा शेरकर,माजी आमदार संतोष टारफे, बाळासाहेब दांगट,अतुल बेनके जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, छायाताई तांबे, नेहा बाबू पाटे, मंगेशअण्णा काकडे,पंकज कणसे, मायाताई लांडे सभापती कमलताई शेळकंदे,उपसभापती अमित ढोले. विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच आदी मान्यवर उपस्थित राहतील.दुपारी एक वाजता अन्नप्रसाद होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ शिरोली खुर्द व शिवसेना उपनेते बबनराव थोरात यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.