आशाताई बुचके यांच्या पुढाकाराने ओझर गावाला मिळाली घंटागाडी

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी )संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टसाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान २०२४-२५ च्या फंडातून ओझोन घंटागाडी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.आशाताई बुचके व कार्यकारी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा श्री.गणेशभाऊ कवडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झाली.या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा श्री क्षेत्र ओझर येथे जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.आशाताई बुचके,कार्यकारी अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा श्री.गणेशभाऊ कवडे,बीडीओ भोईर साहेब,भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोषनाना खैरे व श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब कवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर व ग्रामपंचायत ओझर यांच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.आशाताई बुचके व भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोषनाना खैरे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक श्री.रवीभाऊ गायकवाड,ओझर नं.२ च्या सरपंच तारामतीताई कर्डक,ओझर नं.१ च्या मा.सरपंच मथुराताई कवडे,ओझरचे तलाठी दुलत भाऊसाहेब तसेच ग्रामसेवक थोरात भाऊसाहेब,श्री किशोरभाऊ कवडे,उपसरपंच सुभाष दळवी,श्री.आनंदराव मांडे,श्री.रंगनाथ रवळे,श्री.दशरथ मांडे,श्री विकास कवडे,श्री पुंडलिक कवडे,श्री. श्रीराम पंडित,श्री.रघुनाथशेठ कवडे,श्री.अंबादास कवडे, श्री.बाळासाहेब टेंभेकर,श्री.गणपत टेंभेकर,श्री.पांडुरंग जगदाळे,श्री.शशी पोखरकर,श्री.ज्ञानेश्वर कवडे श्री राजेंद्र कवडे,श्री गणेश थोरात,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कवडे गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर विजय नवले,आनंद कवडे,ओंकार पंडित व आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!