आपटाळे – घाटघर रात्रीची माती वाहतुक बंद करा.. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार – भाऊ देवाडे

WhatsApp

नारायणगाव : प्रतिनिधी
आपटाळे – नाणेघाट रस्त्यावर रात्रीच्या वेळेला मातीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून टिप्पर, दहा टायर गाड्या व डंपर या वाहनाने मातीची वाहतूक केली जात आहे. नियमबाह्य पद्धतीने मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संबंधितांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा शनिवार ( दि.10) रोजी रात्री या या रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी दिला आहे.
दरम्यान महसूल विभागाचे डोळे झाक करून या परिसरामध्ये नियमबाह्य पद्धतीने माती चोरी रात्रीच्या वेळेला अधिक प्रमाणात होत असल्याची तक्रार जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी केली आहे. विशेष म्हणजे मातीची चोरी करणाऱ्या या वाहनांना नंबर प्लेट नाही.रात्रीच्या वेळेला या वाहनांचा कर्कश आवाजाने आपटाळे परिसरातील आम्हा लोकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे व शांतता भंग पावली जात आहे, असे भाऊ देवाडे यांनी निवेदनात म्हणले आहे
दरम्यान शुक्रवारी ( दि.9) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपटाळे गावाजवळ लोकवस्तीच्या बाजूला डंपर पलटी झाला होता. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. तथापि डंपर ज्या रस्त्यावर पलटी झाला आहे त्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.
दरम्यान रात्री अपरात्री नियमबाह्य मातीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी केली आहे. जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके व जुन्नर पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन दिले आहे संबंधित विभागाने जर या माती चोरांवर कारवाई केली नाही तर 10 मे रोजी रात्री आपटाळे- नाणेघाट रोडवर रास्ता रोको केला जाईल असा इशारा भाऊ देवाडे यांनी दिला आहे.

जाहिरात

error: Content is protected !!