अनिल मेहेर यांना द्राक्षभूषण पुरस्कार प्रदान.

WhatsApp

नारायणगाव ( प्रतिनिधी )
ग्रेप ग्रोवर्स फेडरेशन ऑफ इंडिया, पुणे आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा “द्राक्षभूषण” हा राष्ट्रीय पुरस्कार कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष, कृषिरत्न अनिल घमाजी मेहेर यांना
विजयापूर (कर्नाटक) येथील बालमकर कनव्हेशन सभागृहामध्ये येथील कर्नाटक सरकारचे माननीय कापड, ऊस विकास व शेतमाल विपणन व सहकार मंत्री शिवानंद पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर ग्रेप ग्रोवर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोपान कांचन, कर्नाटक येथील भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भीमसेन कोकरे, कैलास भोसले, सेक्रेटरी महेंद्र शाहीर, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स्, पुणे चे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, माजी संचालक डॉ शिखामणी, डॉ. एस डी सावंत, कर्नाटक येथील बागलकोट हॉटिकल्चर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णुवर्धन आदी मान्यवरांच्या उपस्थित होते.

बेदाणा उत्पादन व प्रक्रिया सद्यःस्थिती या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र येथे आयोजित केले होते. या वेळी झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कृषिरत्न अनिल मेहेर हे कृषी पदवीधर असून मागील सहा दशके द्राक्ष शेती व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी निरपेक्ष भावनेने कार्यरत आहेत. आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्ञानाचे द्वार खुले केले असून लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या समवेत ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त तथा त्यांच्या पत्नी सौ. मोनिका मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार प्रमुख राहुल घाडगे उपस्थित होते.

इतर पुरस्कारार्थी (कंसात विभाग) : विभाकर पाटील (कर्नाटक), महादेव चाकोते (सोलापूर), अशोक गायकवाड (नाशिक), जगन्नाथ म्हस्के (सांगली), सेंथिलकुमार (तामीळनाडू), स्व. कनका रेड्डी (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा).

जाहिरात

error: Content is protected !!