कमी बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांमध्ये नाराजी…!

WhatsApp

पारगाव : (प्रतिनिधी )

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी हंगामातील टोमॅटो तोडणी सुरु झाली आहे.उत्पादन देखील चांगले निघत आहे.परंतू टोमॅटोला बाजारभाव मात्र समाधानकारक मिळत नाही. त्यामुळे टोमॅटो पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसूल होणार नसल्याने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी हंगामात टोमॅटो पिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात.टोमॅटोला बाजारभावाची साथ मिळाली शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळतात.परंतू गेल्या अनेक दिवसांपासून टॉमेटोला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही.टोमॅटो पिकासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे भांडवल गुंतवले आहे.परंतू सध्या मिळणाऱ्या बाजारभावातून भांडवल वसूल होणार नाही.त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.
सध्या पारगाव परिसरात टोमॅटो तोडणी सुरू झाली आहे.शेतकरी टोमॅटोची प्रतवारी करून नारायणगाव (ता. जुन्नर )येथील टोमॅटो बाजारात टोमॅटो विक्रीसाठी पाठवत आहेत.परंतू टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही.क्रेटला (२० किलो )दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.हा बाजारभाव शेतकऱ्यांना अपेक्षित नाही.टोमॅटो पिकासाठी शेतकऱ्यांनी रोपे, खते ,औषधे बाग बांधणी यासाठी लाखो रुपयांचे भांडवल गुंतविले आहे .सध्या मिळणाऱ्या बाजारभावातून शेतकऱ्यांनी गुंतवलेले भांडवल वसूल होणार नाही.यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.

आंबेगाव तालुक्यात बहुतांशी भागांमध्ये उन्हाळी हंगामात टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात.यंदा टोमॅटो पिकाला शेवटपर्यंत मुबलक प्रमाणात पाणी मिळाले.तसेच टोमॅटोला अनुकूल हवामानाची साथ मिळाली. कीडी रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला.त्यामुळे टोमॅटो उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे.परंतू बाजारभावाची साथ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी असल्याचे शिंगवे येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी बाळासाहेब वाव्हळ यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!