मंचर (प्रतिनिधी ) जांभोरी एस टी बस मुक्कामी वेळेवर सोडण्यात यावी. या मागणीचे निवेदन एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जांभोरी गावातील नागरिकांच्या वतीने मंचर एस टी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. मंचर जांभोरी एस टी नियमित वेळेत सायंकाळी ६ वाजता सोडण्यात यावी अन्यथा गावातील शाळकरी विध्यार्थी कामगार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या निवेदन प्रसंगी खालील मान्यवरांची उपस्थिती होती. सुनिल गिरंगे. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी अध्यक्ष.उपाध्यक्ष मारुती दादा केंगले. सचिव भिमा केंगले. विकास पोटे. जांभोरी गावच्या सरपंच सुनंदा पारधी. उपसरपंच बबन केंगले. शिवराम केंगले ग्रामपंचायत सदस्य जांभोरी. लिंबाजी केंगले कार्याध्यक्ष ग्रामविकास फाउंडेशन. पोलिस पाटील नवनाथ केंगले सोनाली पोटे बबन केंगले. सामाजिक कार्यकर्ते. काळूराम कोंढवळे उपाध्यक्ष बिरसा ब्रिगेड आंबेगाव. गोविंद केंगले. प्रदिप पारधी जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनात स्पष्ट सांगण्यात आले की जर वेळेत एस टी सेवा पुन्हा सुरु झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा जांभोरी ग्रामस्थ यांनी देण्यात आला आहे.