मंचर ( प्रतिनिधी )फुलवडे,शिनोली, पिंपळगाव येथील कातकरी बांधवांच्या घरकुल संदर्भात बुधवार 4/06/2025 रोजी तालुक्याच्या गटविकास अधिकारी आदरणीय प्रमिलाताई वाळुंज यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने तालुका कार्याध्यक्ष प्रकाश घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेण्यात आली.
फुलवडे येथील वनहक्क दावा अंतर्गत तेथील 13 कुटुंबासाठी घरकुल बांधणेस जागा मंजूर झालेली आहे मात्र तसा आदेश अजून प्राप्त झालेला नसल्याने अद्याप त्या 13 कुटुंबानाचे घरकुल प्रस्ताव पेंडिंग असल्याची माहिती BDO यांनी दीली. त्याबाबत तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे माध्यमातून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत संपर्क करण्यात आला.
शिनोली येथील कातकरी बांधवांसाठी गायरान अंतर्गत दोन टप्प्यात जागा निवड केली असून त्या बाबत ची प्रक्रिया पूर्ण आहे. एकूण 91 कुटुंबासाठी 45 गुंठे जागा मिळाली असून लवकरच आ. दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून 130 कातकरी कुटुंबाना हक्काचा निवारा मिळण्यास मदत होणार आहे
पिंपळगाव येथील 11 कुटुंबासाठी ग्रामपंचायत माध्यमातून जागा उपलब्ध झालेली आहे मात्र एकूण 11 कुटुंबापैकी 4 कुटुंबाणकडेच कागदपत्र असल्याने त्या चार कुटुंबाचाच घरकुल योजनेसाठी अर्ज आले आहेत. मात्र उर्वरित 7 कुटुंबाना कागदपत्र उपलब्ध व्हावीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. यासाठी तहसीलदार कार्यालयातून देखील मदत करण्याचे आवाहन तहसीलदार यांना करण्यात आले.
या विषयांबाबत चे निवेदन आ. दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात येऊन कातकरी कुटुंबाना निवारा मिळावा यासाठी लवकरच तालुकास्तरीय आढावा बैठक आमदारांच्या उपस्थितीत घेण्यात यावी अशी विनंती पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अमोल अंकुश, दिनेश गभाले,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले कुमार घोलप उपस्थित होते.