आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई. 25 लाखांची प्रतिबंधित तंबाखू केली जप्त. चालकाला ठोकल्या बेड्या.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी)
आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पिंपळवंडीच्या चाळकवाडी टोलनाक्याजवळ राज्यात प्रतिबंधित असलेली 25 लाख वीस हजार रुपये किमतीची चुनामिश्रित तंबाखू तसेच कंटेनर गाडी असा तब्बल 45 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी पत्रकारांना दिली. कंटेनरचा चालक अल्तमाश रहमतुल्लाह खान ( वय 38 वर्ष ) याला अटक केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जाधव म्हणाले की राज्यामध्ये प्रतिबंधित असलेली चुनामिस्ट्री तंबाखू नाशिक बाजू कडून आळेफाट्याकडे कंटेनर मधून येणार असल्याची माहिती खबर्यामार्फत मिळाली त्या अनुषंगाने आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे आणि सून विभाग यांनी चाळकवाडी टोल नाक्याजवळ उभा असलेल्या कंटेनर ची तपासणी केली असता या कंटेनरमध्ये चुना मिश्रित तब्बल 25 लाख वीस हजार रुपये किमतीचे तंबाखूचे बॉक्स मिळून आले.
दरम्यान संबंधित गाडी मालक यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये इतरही कोणाच्या सहभाग आहे किंवा कसे याचाही शोध पोलीस असून करीत असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी सांगितले. आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर विश्वास जाधव यांची ही दुसरी मोठी कारवाई आहे. तसेच आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि चोऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी विशेष उपाययोजना केली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!