अखेर मुजोर मुख्याध्यापक व इतरांस मुंबई उच्च न्यायालयाचे अटकेचे आदेश.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 25 जुलै 2025 रोजी रिट पीटिशन क्रमांक 4747/2025 या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी प्रतिवादी क्रमांक 2 व 3 यांना जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश आळेफाटा पोलिस स्टेशन चे प्रभारी यांना दिले आहेत. याबाबत ची माहिती अशी की, याचिकाकर्ते श्री. संभाजी बंडू ढमाले हे शिक्षक ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे या विद्यालयात सन 2012 पासून कार्यरत असून त्यांचा वैयक्तिक मान्यता प्रस्ताव शासनस्तरा वर मान्यते साठी प्रलंबित असताना मुख्याध्यापक व संस्थेने त्यांची जागा पवित्र पोर्टल द्वारे भरण्याचा घाट घातला होता . परिणामी श्री ढमाले यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली . वारंवार नोटीसा बजावण्यात येऊनही तसेच कोर्टाच्या बिलीफ यांनी हस्तपोच नोटीस बजावूनही संबंधित शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप भवारी व इतर मुजोरपणे कोर्टात हजर राहीले नाहीत . त्यामुळे एकप्रकारे उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याने शेवटी न्यायालयाने मुख्याध्यापक श्री भवारी व इतरांना अटक करून दिनांक 8 ऑगस्ट 20 25 रोजी सकाळी अकरा वाजता कोर्टापुढे हजर करण्याचे आदेश आळेफाटा पोलीसांना दिले आहेत . एका नावाजलेल्या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडल्या मुळे याला जबाबदार कोण आहे अशी चर्चा नागरिक व संस्था सभासद करू लागले आहेत .


जाहिरात

error: Content is protected !!