नारायणगाव : (प्रतिनिधी) फाटा येथील सिद्धिविनायक सोसायटी राहत असलेल्या राजेंद्र श्रीपत कुऱ्हाडे यांच्या स्टोअर रूम मध्ये 60 लिटर डिझेलचा साठा बेकायदेशीररित्या आढळल्याने त्यांच्या विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली. जुन्नर तालुक्यातील गजबजलेल्या आळेफाट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड समोरील सिद्धीविनायक सोसायटीत गुरूवारी (दि. 12) रात्री जीओ लोगो असलेल्या डीझेलचे टँकर व एच पी लोगो असलेला कंत्राटदाराचा छोटा टँकर एकमेकात डीझेल बदली करीत असल्याची लेखी तक्रार विजय कुऱ्हाडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महसूल चे विभागीय अधिकारी गोविंद शिंदे जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके यांच्याकडे केल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार शेळके यांनी तातडीने भरारी पथकाचे नियुक्ती करून या पथकाने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने 50 लिटर डिझेलचा कॅन ताब्यात घेऊन राजेंद्र श्रीपती कुराडे यांच्या विरोधात आळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पुरवठा निरीक्षक माधुरी बबनराव संतोषवार यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात केली आहे. आळेफाटा येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये गुरुवारी (दि. 12) जिओ लोगो असलेल्या डिझेलचा टँकर व एच पी लोगो असलेला छोटा टॅंकर एकमेकात डिझेल बदली करून भरीत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुषंगाने आळे गावचे माजी उपसरपंच अॅड विजय कुऱ्हाडे यांनी याबाबत तातडीने आळेफाटा पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांना फोन करून संबंधित व्हीडीओ पाठवून कारवाई करण्याबाबत कळविले,तातडीने पोलिस पथक जागेवर गेले व सर्व प्रकार पाहील्यानंतर संबंधित व्यक्तिंची चौकशी करून सदर प्रकरणी पुरवठा विभागाने कारवाई करणं अपेक्षीत असल्याचे सांगीतले,जिल्हाधिकारी जितंद्र डुडी यांना श्री कुऱ्हाडे या्नी हा प्रकार कळविला व व्हाट्सपद्वारे माहीती व तक्रार पाठविली, पोलीसांनी डीझेलचे नमुने ताब्यात घेतले असून स्थळपहाणी पंचनामा केलेला आहे. दरम्यान शनिवार (दि. 14 ) राजेंद्र श्रीपत कुराडे यांचे निवासस्थानी स्टोअर रूममध्ये 50 लिटरचा डिझेलचा कॅन आढळून आल्याने संबंधित आरोपी यांनी ज्वलनशील पेट्रोलियम पदार्थ निवासस्थानी ठेवण्यास प्रतिबंध असताना देखील अंदाजे 50 लिटर डिझेलची साठवणूक करून त्यांचे निवासस्थानातील स्टोअर रूममध्ये साठवून ठेवण्याचे पोलीस तपासामध्ये निदर्शनात आल्याने कुऱ्हाडे यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 नुसार येत असलेल्या मोटर्स स्पिरिट हायस्पीड डिझेल नियंत्रण आदेश 2005 यातील तरतुदीचे तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 7 चे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने त्या अनुषंगाने पुरवठा निरीक्षक माधुरी बबनराव संतोषवार यांनी राजेंद्र श्रीपत कुऱ्हाडे (वय वर्ष 60 राहणार सिद्धिविनायक सोसायटी आळेफाटा) यांचे विरुद्ध जीवनाशक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 व 7 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.