तस्करी करून आणलेल्या डिझेलची आळेफाटा परिसरात होतेय चोरी?

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी)
आळेफाट्याच्या गजबजलेल्या आळेफाट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड समोरील सिद्धीविनायक सोसायटीत गुरूवारी (दि. 12) रात्री जीओ लोगो असलेल्या डीझेलचे टँकर व एच पी लोगो असलेला कंत्राटदाराचा छोटा टँकर एकमेकात डीझेल बदली करून भरीत असतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळे गावचे माजी उपसरपंच अॅड विजय कुऱ्हाडे यांनी याबाबत तातडीने आळेफाटा पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांना फोन करून संबंधित व्हीडीओ पाठवून कारवाई करण्याबाबत कळविले असून पुरवठा विभागाकडून आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते. दरम्यान पोलिसांनी तातडीने पोलिस पथक जागेवर गेले व सर्व प्रकार पाहील्यानंतर संबंधित व्यक्तिंची चौकशी करून सदर प्रकरणी पुरवठा विभागाने कारवाई करणं अपेक्षीत असल्याचे सांगीतले,जिल्हाधिकारी जितंद्र डुडी यांना कुऱ्हाडे या्नी हा प्रकार कळविला व व्हाट्सपद्वारे माहीती व तक्रार पाठविली घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ दाखल घेतली व तहसिलदार सुनिल शेळके यांनी तातडीने दखल घेत त्याकामी आज शनिवार दि 14 रोजी पथकाची नेमणूक केली आहे,पोलिसा्ंनी सर्व डीझेलचे नमुने ताब्यात घेतले असून स्थळपहाणी पंचनामा केलेला आहे,शिवाय सदर इमारतीतील रहिवाशांनी तक्रार केल्यावर संबंधित व्यक्ती शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने सोसायटीतील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे विजय कुऱ्हाडे यांनी सांगितले. डीझेल चोरी मुंबई पनवेल येथून समुद्र मार्गे भारतात बंदी असलेले डीझेल बोटीतून येत असल्याने तेथून ते अनेक ठिकाणी विक्रीसाठी नेले जात असल्याची संभाषण रेकाॅर्डींग असल्याचे विजय कुऱ्हाडे यांनी सांगितले. डिझेल चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे,यातून सरकारी ठेकेदार महामार्गांची चाललेली कामे यासाठी हे डीझेल वापरत असल्याची खात्रीशीर माहीती तक्रारदार श्री विजय कुऱ्हाडे यांनी दिली. पुणे नाशिक महामार्गावर सुरु असलेले सिमेंट रस्त्याचे कामावर असेलेले डीझेल वहातूक करणारे वाहन डीझेल नेण्यासाठी आलेले व्हीडीओत दिसत आहे व संबंधित ठेकेदार कंपनीचे लोकही दिसत आहेत,यावरून सरकारी ठेकेदार चोरीचे डीझेल वापरून शासकिय कामे करत आहेत का?हा प्रश्न उपस्थित होत असून या सुरू असलेल्या तस्करीला शासकिय अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे किंवा कसे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे,कारण इमारतीच्या पार्किंगमधेय राजरोस पणे डीझेल साठविणे,टँकरमधून ते दुसऱ्या वाहनात भरणे सुरू आहे हे अत्यंत बेकायदेशीर आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे का? आरटीओ कार्यालय सदर वाहनांवर कारवाई करणार का? पोलिस प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार की प्रकरण दडपलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

जाहिरात

error: Content is protected !!