आळे गावच्या सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावेळी तरी दिगंबर घोडेकर यांना सरपंच पदाची संधी मिळणार का?

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी ) आळे गावच्या सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? मंगळवार दि 10 रोजी सरपंच पदाची निवड होणार असून सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? जुन्नर बाजार समितीचे उपसभापती व आळे गावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य प्रीतम काळे आपली ताकद कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरपंच सौ. सविता चंद्रकांत भुजबळ यांचा 1 वर्षाचा सरपंच पदाचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने व तो मंजूर झाल्याने नव्याने सरपंच पदाची निवड होणार आहे.नविन सरपंच निवडीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्देश दिलेले आहेत,त़्यानुसार दि 10 जुन रोजी मंगळवारी आळे ग्रामपंचायत कार्यालयात नवीन सरपंच निवड होणार आहे,वडगाव आनंदचे मंडलाधिकारी श्री काळे हे निवडणूक निर्णय अधिकार म्हणून काम पहाणार आहेत,
दरम्यान या पंचवार्षिक कालावधीत सुरवातीला सरपंच पदावर प्रितम काळे व उपसरपंच पदावर विजय कुऱ्हाडे यांनी काम केले होते,भरघोस निधी गावासाठी तात्कालीन आमदार अतुल बेनके यांचेकडे पाठपुरावा करून मिळविला होता,व गावातील विकासकामांमुळे या दोघांची कारकिर्द उजवी ठरली आहे.साडेतीन वर्षाच्या पुर्ती नंतर त्यांनी राजीनामे दिल्यानंतर प्रितम काळे यांनी ओबीसी प्रवर्गाला सरपंच पद राखीव असल्याने सौ. सविता भुजबळ यांना संधी दिली होती,तथापी सातत्याने दिगंबर घोडेकर यांचे नाव सरपंच पदासाठी चर्चेत होते परंतू ऐनवेळी सविता भुजबळ यांना प्रितम काळे यांनी संधी देत घोडेकर यांना धक्का दिला होता.सुरवातीपासून घोडेकर हे प्रितम काळे व टीम सोबत नसल्याने आपल्या टीममधील सौ भुजबळ यांना संधी दिलेली होती,परंतु आताच्या निवडणूकीत सहामाहीन्यांसाठी तरी घोडेकर यांना संधी मिळतेय का? ते पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे,माजी आमदार अतुल बेनके परिवाराने कायम बेरजेचं राजकारण केलेलं आहे हाच विचार करून प्रितम काळे दिगंबर घोडेकर यांना संधी देवून गावात बेरजेचं राजकारण करतात की ऐनवेळी नवा पत्ता टाकतात ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे,उपसरपंच पदावर कार्यरत राहीलेले व प्रशासकिय कामकाजाचा अनुभव असलेले अॅड विजय कुऱ्हाडे व सहकारी या निवडीत काय भूमिका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे,अॅड कुऱ्हाडे हे स्पष्ट वक्ते असल्याने कोणाच्या आडून कुठलीही भूमिका न घेत थेट घोडेकर यांना सक्षम व अभ्यासू सदस्य म्हणून सरपंच पदावर संधी देण्यासाठी आग्रही असलेचे समजते. प्रितम काळे व विजय कुऱ्हाडे हेच या निवडीत महत्वाचे केंद्रबिंदू मानले जातात. सौ भुजबळ यांनी 1 वर्षाचा सरपंच कार्यकाळ यशश्वी रित्या पुर्ण केला आहे.यापुढेही सक्षम व्यक्ती पदावर बसणं काळाची गरज असून तालुक्यात नावाजलेली व लोकसंख्येनं मोठी असलेली ग्रामपंचायत असलेलं आळे गाव हे महत्वाचं गाव असल्याने ही सरपंच निवड महत्वाची मानली जात आहे,विधानसभा निवडणूकीत आळे गावाला विविध विकासकामांना जेवढा निधी बेनके यांनी दिला त्या बदल्यात बेनकेंना शह काटशहाचं राजकारण गावात असल्याने फारसा मतांचा फायदा करून देण्यात प्रितम काळे काहीसे अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले,परंतू भविष्यात बेरजेचं राजकारण करून सर्वांना सोबत घेत विकासकामांच्या जोरावर पुढे जाणं गरजेचं असल्याने प्रितम काळे व विजय कुऱ्हाडे हे दिगंबर घोडेकर यांना संधी नक्की देतील असं बोललं जात असल्याने ही निवडणूक घोडेकर यांना सोपी असल्याचे मानले जात आहे.तसेच ग्रा पं सदस्य असलेले व मितभाषी ,सतत जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी संपर्कात असणारे मुकूंद उर्फ सखाराम भंडलकर हे ही इच्छुक असल्याने ते कशी मोर्चे बांधणी करतील व बहुमताचा आकडा कसा गाठतील हेही पहावं लागेल,एकंदर गावातील सर्व जेष्ठ व जाणकार मंडळी एकत्र आली तर निवड प्रक्रिया बिनविरोध देखील होवू शकते,अर्थात हे सगळं चित्र 10 तारखेला मंगळवारी स्पष्ट होणार आहे. पाहूया कोण होतय आळे गावचा नवा कारभारी ? याबाबतची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

जाहिरात

error: Content is protected !!