भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी.

WhatsApp
नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा     दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ आर्थिक वर्षाची ३० वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
     वार्षिक सभेमध्ये मागील सभेचा कामकाज वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेच्या सन २०२५-२६ वर्षासाठीचा कामकाज अहवाल, नफा तोटापत्रक व दि. ३१.०३.२०२६ रोजीचा ताळेबंद स्वीकारणे व मंजूर करणे, सन २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व सन २०२४-२५ वर्षाचा लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे, सन २०२६-२७ वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणुक व शुल्क ठरविणे, सन २०२६-२७ वर्षासाठी संचालक मंडळाने सादर केलेल्या भांडवली व महसुली अंदाजपत्रकाची, सन २०२५-२६ वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या जमाखर्चास मान्यता देणे, भाग विकास निधी रक्कमेच्या विनियोगास मान्यता देणे, भाग विकास निधी व भीमाशंकर शिक्षण संस्था निधी कपातीस मान्यता देणे, ऊस बिलातून कपात केलेल्या ठेवीची रक्कम परत करणेसाठी मुदतवाढीस मान्यता देणे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारणीबाबत निर्णय घेणे, स्क्रॅप मटेरियल विक्रीस मान्यता देणे इत्यादी विषयी चर्चा होणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!