मुक्‍तादेवी पतसंस्थेकडून 13 टक्के लाभांशासह दिवाळी भेटवस्तू वाटप.

WhatsApp


गुंजाळवाडी : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
मुक्‍तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला अहवाल वर्षात ९ कोटी ६४ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, सभासदांना 13 टक्के लाभांश व दिवाळी भेटवस्तू देण्याचा निर्णय संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष किसन मल्हारी वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष योगेश शिंदे, संचालक गौरव वायकर, चंद्रकांत मोरे, सचिन जुदरे, प्रकाश देरेकर, विशाल शिंदे, सावळेराम सोलाट, अंकुश चव्हाण, अक्षय शिंदे, पंढरीनाथ मोरे, संचालिका मनिषा डोंगरे, आरती सोलाट तसेच संचालक राजू जाधव, रविंद्र तोडकर आदी उपस्थित होते.
संस्थेच्या प्रगतीबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले. सभासदांच्या शाश्वत प्रगतीसाठी घरकुलाच्या धर्तीवर स्वमालकीची इमारत असावी, यासाठी उपक्रम राबविण्यात येत असून संस्थेने ९०० कोटी रुपयांचा ठेवींचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अहवालानुसार संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सभासद संख्या ४३४२, ठेवी १०९ कोटी ३ लाख रुपये, कर्ज ४८ कोटी ६६ लाख रुपये, गुंतवणूक ३० कोटी ६ लाख रुपये आणि खेळते भांडवल १२३ कोटी ६ लाख रुपये असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. संस्थेस स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त आहे.
संस्थेच्या प्रगतीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करत संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

जाहिरात

error: Content is protected !!