जुन्नर तालुका महा ई सेवा केंद्राच्या अध्यक्षपदी राजेश बाप्ते

नारायणगाव : विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

जुन्नर तालुका महा ई सेवा केंद्र संघटनेच्या अध्यक्षपदी नारायणगाव येथील ई सेवा केंद्राचे संचालक राजेश दिनकर बाप्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नारायणगाव येथील हॉटेल गारंबी येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र तसेच आधार केंद्र चालकांची संयुक्त बैठक संघटनेचे मावळते अध्यक्ष अँड. संजय उकिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तालुका उपाध्यक्षपदी सुनील विश्वसराव आणि सचिवपदी हर्षवर्धन कुरहे यांची निवड करण्यात आली. तसेच राजुरी येथील संपत हाडवळे यांची संचालक म्हणून, तर प्रकाश काळे, अब्दुलरज्जाक सय्यद, मंदार अहिनवे, दिनेश लोहोटे, नीलम शिंदे, अशोक बोचरे, प्रवीण भालेराव, गणेश कांबळे यांची संचालकपदी आणि माध्यम प्रसिद्धीप्रमुखपदी अजित पानसरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस विकास चव्हाण, विजय पळसकर, दिलीप तांबे, नयना भोरे, गणेश कांबळे, सचिन शिर्के, सलीम मुलाणी, तेजस वारुळे, गणेश दाते, रोहित जठार, सौ. सविता जाधव, जयश्री गडगे, जगदीश कडलक, विकास तळपे, ऐश्वर्या दरेकर, सुषमा दांट, वर्षा बेल्हेकर, सुमित दांगट यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला. महा ई सेवा केंद्र चालकांना येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश बाप्ते यांनी दिले. @फोटो खालील ओळ -जुन्नर तालुका महा ई सेवा केंद्राच्या अध्यक्षपदी राजेश बाप्ते यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकारणी सदस्य. (छाया – सुरेश वाणी )

जाहिरात

error: Content is protected !!