नारायणगाव : मागील वर्षी मे महिन्यापासून अनियमित व अतिवृष्टीमुळे उसाची लागवड उशिरा झाली. लागवड झालेल्या क्षेत्रातही सतत पडणारा पाऊस आणि त्यानंतर आलेल्या थंडीमुळे उसाची वाढ अपेक्षित प्रमाणात झाली नाही. त्यातच साखर कारखान्यांचे गाळप फेब्रुवारी महिन्यातच संपल्यामुळे बाजारात उसाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रसवंतीसाठी उसाचे दर अक्षरशः सुमारे ₹५,००० प्रति टनपर्यंत गेले असून, चाऱ्यासाठी सुमारे ₹३,५०० प्रति टन दर मिळत आहे.
ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी एकीकडे संधी असली तरी दुसरीकडे धोका देखील आहे. काही व्यापारी ऊस तोडून नेतात, मात्र पैसे वेळेवर देत नाहीत किंवा थकवतात, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घ्यावी:लेखी कराराशिवाय ऊस देऊ नये.आधार कार्ड / ओळखपत्र व पूर्ण पत्ता घ्यावा.
ऑनलाइन व्यवहार किंवा RTGS/NEFT द्वारे पैसे घ्यावेत.अॅडव्हान्स रक्कम घेतल्याशिवाय तोडणी करू देऊ नये.शक्य असल्यास व्यवहाराची नोंद ग्रामपंचायत किंवा स्थानिक संघटनेमार्फत ठेवावी.