मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत संगणक लॅब चा नावीन्यपूर्ण उपक्रम.

WhatsApp

विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा

येणेरे ही जुन्नर तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये आघाडीवर असुन विञान दिनाचे निमित्ताने जि. प .प्राथमिक शाळा, येणेरे येथे SKF India ltd. यांचे सामाजिक दायित्व निधी CSR मधून 10 लॅपटॉप व आवश्यक साहित्य मिळाले.या प्रसंगी संगणक लॅब चे उदघाट्न, विज्ञान प्रदर्शन, लॅपटॉप प्रदान कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. SKF india ltd चे CSR हेड श्री. मयूर देशमुख,गणेश भुजबळ, पंचायत समिती सदस्य अमित ढोले,सरपंच अमोल भुजबळ, पोलीस पाटील सत्यवान घोगरे ग्रा.पं.सदस्य, ईश्वर ढोले व अरिफा पठाण,जि. प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पानसरे , येणेरे ग्रामस्थ व पालकांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.सर्व शिक्षक वृंद आमले मॅडम, सदाकाळ सर, चाळणेवाड सर व ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र मलघे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी जि. प. पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील सर यांनी झूम कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या.संगणक लॅब साठी लॅपटॉप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.या नावीन्यपर उपक्रमामुळे अभियानास मदत होणार आहे.

जाहिरात

error: Content is protected !!