वडगाव सहानी येथे शेतामध्ये बिबट्याचा मृत्यू.

WhatsApp

.
नारायणगाव :  वडगाव सहानी (तालुका जुन्नर जिल्हा पुणे) येथील शेतकरी वैभव शिंदे यांच्या शेतामध्ये नर जातीचा आठ महिन्याचा बिबट्या मृत अवस्थेत आढळला असल्याची माहिती जुन्नरचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे.  वडगाव शहाणे येथील वैभव शिंदे हे आपल्या शेतामध्ये पिकाची पाहणी करायला जात असताना त्यांना त्यांच्या शेतामध्ये बिबट्याचा मृत अवस्थेत आढळला. सुरुवातीला त्यांना वाटले की हा बिबट्या जिवंत असावा. त्यांनी तातडीने ही माहिती वन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता हा बिबट्या मृत झाल्याचे लक्षात आल्याने वनविभागाच्या वाहनांमध्ये त्याचा मृतदेह माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवण्यात आला असून त्या ठिकाणी सविच्छेदन करून त्याचा अंत्यविधी करण्यात आला आहे. दरम्यान वडगाव सहानी येथील शिंदे मळ्यामध्ये बिबट्याचा वावर दररोजचा झाला असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याबाबत तातडीने दखल घेऊन येथे पिंजरा लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खंडू शिंदे यांनी केली आहे.     दरम्यान दोन बिबट्याच्या झुंझीमध्ये हा बिबट्या मृत्यू झाला असावा असा अंदाज वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी व्यक्त केला असून कदाचित दुसऱ्या बिबट्याचा वंश वाढू नये म्हणून देखील एखाद्या नराने या बिबट्याला मारून टाकले असावे. तथापि या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांच्या मागणीनुसार वडगाव सहाणी परिसरातील शिंदे मळ्यात तातडीने पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!