नारायणगाव : वारंवार पाठपुरावा करून देखील जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. आपल्याला कुणीच सहकार्य करत नाही हा विचार करत आर्वी येथील एका महिलेने टेलिफोनच्या 150 फूट उंचीच्या टॉवरवर चढून आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार आर्वी तालुका जुन्नर) येथे मंगळवारी (दि 6) येथे घडला. सविता बापू कांबळे (वय 38) असे आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर समजलेली माहिती अशी की आर्वी येथे सविता बापू कांबळे या महिला आपल्या कुटुंबासह गेले अनेक वर्ष राहतात. त्यांचे पती बापू कांबळे यांच्याकडे जातीचा दाखला आहे परंतु सविता यांचे माहेर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील असल्याने त्यांना दाखला मिळत नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत होती. सरकारी दरबारी अनेक वेळा खेटा मारल्या परंतु प्रश्न मार्गी लागत नाही. मुलांच्या आयुष्याचं काय होणार या चिंतेत या महिलेने घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या दूरसंचार विभागाच्या दीडशे फूट उंचीच्या टॉवरवर चढून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. दरम्यान या महिलेने घरातून बाहेर पडताना त्यांनी काहीच न सांगितल्यामुळे घरच्यांनी त्यांची खूप शोधाशोध केली परंतु काही शोध लागला नाही. टॉवरवर कावळे जमा झाल्यामुळे व त्यांच्या ओरडण्याने काय केले माहिती का ते कार्यक्रम आहे आजूबाजूची लोकं इथे कावळे का जमा झालेत ते पाहू लागल्याने या टॉवरवर एक महिला चढली असल्याचे स्थानिकांनी सरपंच व पोलीस पाटील तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनला कळवले. नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु मला कोणाशी बोलायचं नाही मला थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलायचं आहे माझ्यावर अन्याय होतोय असे म्हणत या महिलेने पोलीस यंत्रनेशी बोलण्याचे टाळले. तद नंतर पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू टीमशी संपर्क साधून त्यांना तात्काळ पाचारण केले. रेस्क्यू टीमने या महिलेला खाली उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या महिलेवर नारायणगाव येथील सरकारी ग्रामीण डोळ्यात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिलेची भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी भेट घेऊन तुमचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. दरम्यान या संदर्भात जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधित महिलेने दाखला मिळावा याबाबत या कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही. तथापि त्यांना हवा असलेला जातीचा दाखला कागदपत्र पाहून देण्याची प्रयत्न करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले. दरम्यान या महिलेचा मुलगा जुन्नर तालुक्यातील एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. फी भरल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला देणार नाही असा देखील तगादा या शिक्षण संस्थेने लावला असल्याने पैसे आणायचे कुठून असे देखील टेन्शन असल्याचे महिलेने सांगितले.