विघ्नहर टाइम्स वृत्तसेवा
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता असून कोणत्या पक्षाशी कोणाबरोबर आघाडी होणार याबाबतची उत्सुकता जुन्नर तालुक्यातील जनतेला लागली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सध्या मोठ्या प्रमाणात शांतता पाहायला मिळत आहे. दोन राष्ट्रवादी व शिवसेना(UBT) यांची आघाडी होणार किंवा नाही याबाबतही उलट सुलट चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकाही गटात उमेदवाराची अद्याप घोषणा न झाल्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. सावरगाव गटामध्ये पूजा बुट्टे यांनी फ्लेक्स लावलेले आहेत. बारव गटामध्ये सुनीता बोराडे की माई लांडे हा निर्णय अद्याप होत नसल्यामुळे याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. मायी लांडे यांना उमेदवारी दिल्यास सुनिता बोराडे या शिवसेना पक्षाच्या उमेदवारा असू शकतात. अथवा सुनीता बोराडे यांना उमेदवारी दिल्यास माई लांडे अपक्ष अथवा शिवसैनिक कडे वर्ग होऊ शकतात. हे पक्ष नेतृत्वाला माहीत असताना देखील या ठिकाणचा निर्णय घेतला जात नाही.
बोरी गटात देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून काळे की पवार हा देखील निर्णय होत नाही. राजुरी गटामध्ये शेळके कुटुंबाला सपोर्ट करून पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळू शकतो या ठिकाणी शेळके यांचे वजन निश्चित चांगले आहे. इतर गटामध्ये मात्र बऱ्यापैकी सामसूम दिसत आहे. पिंपळवंडी गटामध्ये विजय कुऱ्हाडे यांची उमेदवारी जाहीर करणे पक्ष नेतृत्वाला काहीच अवघड नाही परंतु या ठिकाणी मंगेश काकडे आपल्याकडे येतात का याकडे पक्ष नेतृत्वाचा लक्ष आहे. परंतु काकडे यांनी केवळझुलवत ठेवले आहे हे नेतृत्वाच्या लक्षात यायला हवं. कुऱ्हाडे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली तर याचा फायदा भविष्य काळामध्ये निश्चित होऊ शकतो. याचा पक्ष नेतृत्व विचार का करत नाही याचे देखील कोडे उलगडत नाही. निर्णय लवकर झाला नाही तर कुऱ्हाडे दुरावले तर याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो. विजय कुऱ्हाडे थांबणारे नेतृत्व नाही. ते भविष्यकाळाचे जुन्नर तालुक्याचे अभ्यासून नेतृत्व ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना सोबत ठेवणे त्यांच्या हिताचे निश्चित आहे. कुऱ्हाडे यांचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिताची असून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याही काही सल्ल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने करून घेणे हिताचे ठरेल. बोरी गटामध्ये शिवसेना माऊली खंडागळे यांच्या गृहमंत्र्याचा विचार करू शकते. तसेच पिंपळवंडी गटामध्ये मंगेश काकडे धनुष्यबाणाचे उमेदवार होऊ शकतात. या गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते जरी मंगेश काकडे यांना शिवसेनेत घेण्यास विरोध करत असली तरी त्या पक्षाचे नेतृत्व काकडे यांना पक्षात घेण्यात सहमत झाल्याची माहिती मिळत आहे. या पक्षाच्या नेतृत्वाला मंत्रिपद मिळवायचे असल्यामुळे जुन्नर तालुक्याबरोबरच जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवायची आहे त्यामुळे ते वेगवेगळे डाव प्रति डाव निवडणुकीत खेळत आहेत व काही प्रमाणात ते यशस्वी देखील होत आहेत. निर्णय घेण्याच्या खुर्चीवर असल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आपोआपच गोळा होत आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासू कार्यकर्त्यांना साथ देऊन त्यांचा एकोपा टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना टिकून ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला निश्चित फायद्याचे आहे. दुरावलेले कार्यकर्ते त्यांना देखील आपलेसे करण्याचा प्रयत्न करायला हवा. राजकारण खेळून पाहू नये तर पाहून खेळावे या सूत्राचा त्यांनी अवलंब करावा.
दरम्यान जुन्नर नगरपरिषद निवडणुकीत आमदार विरुद्ध माजी आमदार अशीच निवडणूक झाली व जिल्हा परिषदेत देखील अशीच निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने भविष्यकाळाचा वेध घेऊन पावले उचलायला हवीत. दुरावलेले कार्यकर्ते तर पुन्हा जवळ केले तर भविष्यकाळात तोटा होण्याची ऐवजी फायदा होऊ शकतो. सुरज वाजगे, विजय कुऱ्हाडे तसेच बाळासाहेब सदाकाळ या दुरावलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निर्णय क्षमता वाढवायला हवी. सध्याचे राजकीय वातावरण सर्वत्र कलुषित झालेले आपण पाहतो. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये अद्यापही राजकीय वातावरण फारसे बिघडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील नेतृत्वाने विचारपूर्वक निर्णय घेतल्यास भविष्यकाळ त्यांना अधिक चांगला होऊ शकतो.तुतारी चे खासदार आणि कारखाना चेअरमन असूनही पक्षात मरगळ का
तालुका अध्यक्ष बदलावा अशी पक्षातील अनेक नेत्यांची कुजबुज आहे.
तसेच मशाल उबाठा पक्षाचे तालुक्यात पन्नास हजारा पेक्षा जास्त मतदान असल्या चे लोकसभेवेळी आणि विधानसभा निवडणूक वेळी सांगणारे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद निवडणूक बाबत उदासीन दिसतात फक्त स्वतः च्या गटात आपली उमेदवारी साठी ते फिल्डिंग लावण्यात व्यस्त असल्याचे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते कुजबुज करत आहेत.
भाजप पक्ष राज्यात व देशात ताकदवर असताना तालुक्यातील भाजप फक्त आशाताई या एकाच उमेदवारी वर फिरतोय
भाजपचे तालुका अध्यक्ष कोण हे जनतेला माहित नसावे एवढे ते निष्क्रिय दिसतात पक्ष वाढीसाठी ते समोर येताना दिसत नाही
काँग्रेस पक्ष फक्त विधानसभा व लोकसभेला दबाव तंत्र आणून आपला कारखाना सेप ठेवण्या पुरताच दिसतो इतर वेळी काँग्रेस पक्ष तालुक्यात दिसत नाही अथवा पक्ष वाढीसाठी तालुका अध्यक्ष कधी प्रयत्न करत नाही. यापक्षाचा वापर करून जुन्नर नगरपालिकेत धनुष्यबाण सत्तेत विराजमान झाल्याची उघड चर्चा होत आहे.तुतारी चे तुषार थोरात, अनंतराव चौगुले, शरदराव लेंडे, मोहीमशेठ ढमाले, अंकूशशेठ आमले हे दिग्गज विधानसभेला उमेदवारी साठी इच्छुक होते. मात्र ते नंतर तालुक्यातील राजकारणात थंड दिसत आहेत. या दिग्गज नेत्यांपैकी तीन नेते जिल्हा परिषद सदस्य होते. तरीही ते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीला सामोरे जाण्यास उत्सुक दिसत नाहीत. अथवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देताना दिसत नाहित विधानसभा सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन नंबर चे मतदान झाले असतानाही या पक्षात मरगळ दिसते.दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यावर मात्र हे नेते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. रान तयार दिसले तरच संधीचा फायदा घेऊन आपणच दावेदार असल्याचे भासवून हे मरगळलेले नेते पुन्हा जोशात येऊ शकतात.