ओतूरला बिबटया पकडला.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी )मौजे अमीरघाट ओतूर येथे काही दिवसापूर्वी लोकांचे मागणी नुसार लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये दिनांक 22/12/2025 रोजी पहाटे अंदाजे 5:00 वाजताच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये अंदाजे 6 ते 7 महिन्याचे मादी बिबट बछडा जेरबंद झाला होता. तदनंतर ग्रामस्थांनी सदर ठिकाणी दुसऱ्यांदा पिंजरा लावण्याची मागणी केली होती.त्याच दरम्यान सदर बछड्याला रीयुनियन करण्याचे नियोजित असल्यामुळे बिबट मादी बछडा उदापूर नर्सरी येथे ठेवण्यात आली परंतु दोन दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये दिनांक 24 /12 /2025 रोजी रात्री अंदाजे 10:00 वाजण्याच्या सुमारास बिबट मादी वय अंदाजे ६ ते ७ वर्षे जेरबंद करण्यात आली तदनंतर बिबट्याला ताब्यात घेऊन दोन्ही बिबट् बछडा व मादी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे यांनी दिली.

जाहिरात

error: Content is protected !!