नारायणगाव : (प्रतिनिधी)
जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारामध्ये जोरदार रंगत सुरू झाली असून प्रभाग क्रमांक आठ मध्ये जुन्नर नगर परिषदेचे माजी उप नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार दीपेश परदेशी तसेच नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवार तृप्ती परदेशी यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रभागातील मतदारांचा दोघांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक आठ मधील कार्यालयाचे उद्घाटन भाजपा नेत्या आशाताई बुचके आशाताई बुचके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे,माजी नगराध्यक्ष सतीश परदेशी, माजी नगरसेवकशामसिंग खोत, माजी नगरसेवकसुजित हजारी,डॉ.लुकेश खोत
भाजपा शहर प्रमुख सचिन खत्री,मंडलाधिकारी रोहित परदेशी,
डॉ. राजश्री इंगवले महिला आघाडी प्रमुख जुन्नर शहर संजय हजारी,
दीपक परदेशी, बलदेव परदेशी,रोहित खोत राजपूत समाज संघटना
बालाजी विजापुरे आदी उपस्थित होते.
या प्रभागातील कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला साधला. तसेच या प्रभागात फेरी देखील काढण्यात आली. या फेरीमध्ये प्रभागातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जुन्नर शहराच्या उपनगराध्यक्ष असताना या परिसरातील सगळी कामे मी मार्गी लावलेली आहेत. तसेच तृप्ती परदेशी यांचे काम देखील खूप चांगले राहिलेले आहे. भाजपा नेत्या आशाताई बुचके यांच्या माध्यमातून जुन्नर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने मतदारांचा कौल देखील आमच्यासोबत असल्याचे तृप्ती परदेशी व दीपेश परदेशी यांनी सांगितले.
आशाताई बुचके म्हणाले की, आठ नंबर प्रभागातील दोन्ही उमेदवार तुल्यबळ असून मतदारांचा प्रतिसाद त्यांना सर्वाधिक असल्याने या दोघांचा विजय निश्चित आहे.