नारायणगाव : ( प्रतिनिधी) नारायणगाव परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून सोसायटीच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच ऊस व केळी पीक भुई सपाट होत असल्याने केळी उत्पादकांना देखील मोठा आर्थिक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील या पावसाचा अधिकचा फटका बसणार आहे.
नारायणगाव परिसरामध्ये अवकाळी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यामध्ये फ्लॉवर, कोबी तसेच इतर तरकारी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. गवार,कोबी, भेंडी त्याचबरोबर फरशी, वाटाणा, चवळी, वांगी टोमॅटो या सर्व पिकांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. प्रामुख्याने सध्या तोडणी ला आलेला ऊस सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी भुईसपाट झाला आहे. तसेच काही ठिकाणी केळीच्या बागा देखील पडले आहेत. त्यामुळे तोडणी ला आलेले केळीचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरम्यान द्राक्ष पिकाचे छाटणीचे काम अंतिम टप्प्यात असून या पावसामुळे या कामाला अडथळा निर्माण होत असून दिवाळीनिमित्त हे सगळे लेबर गावी गेले होते. आताच हे मजूर पुन्हा परत आले आहेत परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांच्या उर्वरित कामाला व्यत्यय येत आहे.ज्या द्राक्ष बागांना घड लागले आहेत ते या पावसामुळे पूर्णपणे विरून जाणार आहेत. तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असून फवारणीचा खर्च अधिकचा होणार आहे त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम पूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.