नारायणगाव : (प्रतिनिधी )श्री क्षेत्र ओझर हे अष्टविनायक तिर्थक्षेत्रातील अत्यंत पवित्र तिर्थक्षेत्र आहे, देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा देवस्थान ट्रस्ट पुरवत आहे. रविवार दिनांक १२/१०/२०२५ रोजी जुन्नर तालुका पर्यटन तालुका, पर्यटन क्षेत्राला नवी चालना देणारी बर्गमॅन (BERGMAN) स्पर्धा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व डेक्कन स्पोर्टस् क्लब कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब चिं. कवडे , उपाध्यक्ष तुषार शि. कवडे सचिव सुनिल द. घेगडे यांनी दिली. सदर स्पर्धेसाठी अमेरीका, जपान, तैवान, आस्ट्रेलिया तसेच भारतामधील दिल्ली, झारखंड, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश अश्या विविध देश तसेच राज्यातून ५०० आंतरराष्ट्रीय दर्जांच्या स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. १२ आक्टोंबर २०२५ रोजी पहाटे ६.३० वाजता जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त संतोष कवडे, समिर मांडे, विनायक मांडे, प्रकाश मांडे, विलास कवडे तसेच डेक्कन स्पोर्टस चे मान … . . हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला.
बर्गमॅन ( BERGMAN ) स्पर्धेमध्ये २ किलो मीटर स्विमिंग, ९० किलो मीटर सायकलींग तसेच २१ किलोमीटर रनिंग ह्या तिन्ही प्रकारामध्ये भाग घेऊन ८ तास ३० मिनीटामध्ये स्पर्धा पुर्ण करणारा स्पर्धक बर्ग मॅन ठरतो.
सदर स्पर्धेला खुप मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला तसेच अतिशय उत्साहाच्या वातावरणात स्पर्धा पार पडली. श्रीक्षेत्र ओझरचे वातावरण, येक्षीत स्वच्छता तसेच ह्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेली पॉझीटिव्ह उर्जा स्पर्धकांचे चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद या स्पर्धेच्या यशस्वी तेची ग्वाही देत होता. श्री विघ्नहर गणपती देवस्थानचा परिसर व पुरविलेली सुविधा याची सर्व स्पर्धक आणि डेक्कन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांनी स्तूती केली तसेच पुढील वर्षीसुद्धा याहीपेक्षा मोठी (स्पर्धा ) कार्यक्रम घेण्याची ईच्छा बोलून दाखवली.
स्पर्धेसाठी अनेक देशामधून तसेच भारतामधील अनेक राज्यातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेचे केलेले शुटींग तसेच काढलेले फोटोग्राफ यामुळे विघ्नहर देवस्थान तसेच आपल्या जुन्नर तालुक्याचे नाव जगाच्या इतिहासात प्रथमच जाणार असल्याचा सार्थ अभिमान देवस्थानच्या विश्वस्तांना तसेच ओझरकर ग्रामस्थांना आहे.