नारायणगाव : ( प्रतिनिधी )
इनरव्हील क्लब यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ११२ जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रक्तदाते संजय सहाने यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रक्तदाते किरण वाजगे यांनी ५३ व्या वेळी रक्तदान केले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष समृद्धी वाजगे, उपाध्यक्ष सुजाता भुजबळ, खजिनदार ज्योती सोमवंशी, पास्ट प्रेसिडेंट सविता खैरे, आदिशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष अंजली खैरे, स्मिता वाजगे, माधुरी चौधरी, डॉक्टर नंदिनी घाडगे, प्रगती नवले तसेच शिवनेरी ब्लड बँकेचे पदाधिकारी, रक्तदाते आदी मान्यवर उपस्थित होते.
इनरव्हील क्लब वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. यापूर्वी वृक्षारोपण आरोग्य शिबिर विविध पारंपरिक व सांस्कृतिक स्पर्धा, स्वच्छता अभियान याशिवाय दोन वेळा रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम आयोजित केले आहे. आज झालेले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्मिता वाजगे, प्रगती नवले व इनरव्हील क्लबच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.