नारायणगाव : (प्रतिनिधी) पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा जुन्नर सत्र न्यायालयाने सशर्त जामीन गुरुवारी मंजूर केला असून पन्नास हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांची सुटका होणार आहे. जुन्नरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश संध्या नायर यांनी देवराम लांडे यांचा अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला असल्याची माहिती ॲडव्होकेट केतन पडवळ यांनी दिली. दरम्यान देवराम लांडे यांचा जामीन मंजूर झाला असला तरी न्यायालयाच्या आदेशाचा लखोटा एरोडा कारागृहात वेळेवर पोचणार नसल्याने आजची रात्र त्यांना येरवडा जेलमध्ये काढावी लागणार आहे. नया नयाने देवराम लांडे यांना विनापरवाना कोणताही कार्यक्रम करायचा नाही साक्षीदार व फिर्यादी यांच्यावर दबावा आणायचा नाही तसेच पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. देवराम लांडे यांच्या वतीने न्यायालयामध्ये ऍड. सुमित निकम व ऍड. केतन कुमार पडवळ यांनी बाजू मांडली दरम्यान देवराम लांडे यांचे पुत्र अमोल लांडे याच्यावरही या संदर्भात गुन्हा दाखल असून तो फरार असून त्याचा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.