महाराष्ट्र अर्बन को- ऑप.बँक्स् फेडरेशन लि .मुंबई यंचे माघ्यमातून “सर्वोंत्कृष्ट बँक सन २०२४-२५” पुरस्काराने लाला बँकेचा गौरब..! युवराज बाणखेले

WhatsApp

नारायणगाव: पुढारी वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील नावाजलेल्या लाला अर्बन को- ऑप बँक लि. या बँकेला सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षामध्ये सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्याबदद्ल महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स् फेडरेशनने या बँकेच्या कार्याची दखल घेऊन ५०१ कोटी रुपयांच्या चेवर ते 2000 कोटी पर्ंत ठेवी असलेल्या बँका या गटातून जाहीर केलेला “सर्वोतुकुष्ठ बँक सन २०२४-२५ पुरस्कार” शनिवार दि१३ सष्टेबर २०२५ रोजी नाशिक येथे आयोजित समारंभात बँकेच्या वतीने चेअरमन युवराज बाणखेले व उपस्थित संचालकांनी स्विकारला. या प्रंसंगी बोलताना अध्यक्ष युवराज बाणखेले म्हणाले की, बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व.किसनरावज बाणखेले यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून नव्याने सभासद हिताचे निर्णय घेण्याची परंपरा पुढे संचालक मंडळाने पुढे सुरु ठेवली आहे. बँकेने सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये ६८ कोटी इतकी वाढ केली असुन कर्जामध्ये ४0 को्टीची वाढ केली आहे. बँकेचा सी.आर.ए.आर.१५.१७ % असून नेट.एन.पी.प्रमाण 0 % टक्के राखले आहे. बँकेस ऑडीट वर्ग “अ” ‘प्राप्त आहे. या निकषांच्या आधारावर बँकेला परस्कार जाहीर झालेला आहे. १५ सप्टेंबर २०२५ अखेर बँकेच्या एकूण ठेवी ५२२ कोटी असून एकूण कर्ज ३५२ कोटी आहे. १४ ‘शाखांसह बँकेचा मिश्र व्यवसाय ८८४ कोटी इतका आहे. बँकेच्या या यशाचे शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. लवकरच बँकेच मुख्य कार्यालयासाठी स्वमालकीच्या प्रशस्त जागेमध्ये बांधकाम केले जाणार आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचे माध्यमातून आर्थिक मागास वर्गासाठी कर्जपुरठा बँकेमार्फत केला जातो.चांगली बँकींग सेवा पुरविण्यासाठी लाला बँक तत्पर आहे. बँकेच्या या यशाचे सर्वस्वी श्रेय बंँकेचे सर्व सभासद, खातेदार व हितचिंतक यांचे आहे.असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गंजाळ, व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सी.ए.जैनुदद्रीन मुल्ला, संचालक निवृती काळे, रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, मंगेश बाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, संदीप लंडे, डॉ.सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदूमती कवडे, बाळासाहेब शिंदे, भानुदास टेंगले, तज्ञ संचालक किरण कऱ्हाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, कर्ज अधिकारी प्रमोद कांबळे, वसुली अधिकारी संतोष पटाडे, गुंतवणुक अधिकारी मनोहर गभाले उपस्थित होते. @फोटखालील ओळ -लाला बँकेला मिळालेला सर्वोत्कृष्ठ बँक पुरस्कार मान्यरांच्या हस्ते लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले व इतर संचालकांनी स्वीकारला. (छाया – सुरेश वाणी )

जाहिरात

error: Content is protected !!