लायन हार्टेड होणाजी केंगले यांच्या स्मारका बाबत स्मारक समितीच्या सदस्यांनी घेतली दिलीप वळसे पाटील यांची भेट.

WhatsApp

मंचर : (प्रतिनिधी )

नामदार साहेबांच्या मार्गदर्शनातून स्मारक समिती लायन हार्टेड होणाजी केंगले यांचा पुतळा तयार करण्याबाबत पुतळा तयार करण्याचे काम करणाऱ्या मंचर गावच्या भूषण सुप्रियाताई शिंदे यांच्या वर्कशॉप ला पुढच्या आठवड्यात नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब भेट देणार असल्याचे समजले.

जांभोरी येथे नियोजित असणाऱ्या लायन हार्टेड होनाजी केंगले यांच्या स्मारकबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रवीण पारधी यांच्या माध्यमातून स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले दादा यांच्या अध्यक्षतेखाली भेट घेतली असून
मागील काही दिवसांपूर्वी नामदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांसोबत झालेल्या आढावा बैठकीत या प्रस्तावित स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली होती.
त्याच बैठकीला अनुसरून आज स्मारक समिती चे सदस्य व जांभोरी गावचे ग्रामस्थ या सर्वांनी मिळून आज नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे व पुणे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
यावेळी साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला नियोजित जागेला भेट देऊन पुढील 15 दिवसात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार DPR तयार करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी साहेबांच्याच मार्गदर्शनातून तसेच मंचर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुहासभाऊ बाणखेले यांच्या माध्यमातून पुतळा घडवण्याचे उत्कृष्ट काम करणाऱ्या मंचर गावच्या भूषण सुप्रियाताई शिंदे यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला.
लायन हार्टेड होनाजी केंगले यांचा पुतळा तयार करण्याबाबत पुढील आठवड्यात समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने सुप्रिया ताई च्या वर्कशॉप ला पुणे येथे भेट देणार असून पुढील आठवड्यातच सर्वांजिंक बांधकाम विभागाच्या वतीने नियोजित जागेची पाहणी करण्यात येऊन DPR बनवण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
यावेळी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब, माजी सभापती प्रकाशराव घोलप साहेब, माजी सभापती संजय गवारी साहेब, युवक चे अध्यक्ष वैभव दादा उंडे, युवा नेते अमोल अंकुश, बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात शरद बांबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, उपसरपंच बबन केंगले, युवानेते प्रविण पारधी, दिनेश गभाले, पुनाजी पारधी, ज्ञानेश्वर पारधी, विठ्ठल पारधी, सुनिल गिरंगे, मारुती केंगले , गोविंद केंगले,दुंदा किरवे, हेमंत केंगले, सुरेश केंगले,
स्मारक समितीचे सदस्य तसेच जांभोरी गावचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!