नारायणगाव : (प्रतिनिधी) गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यादववाडी येथील श्री. गणेश मंदिर सभामंडप बांधणे या विकासकामांचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते तसेच गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, आज पर्यंत आमच्या कुटुंबियांनी जनतेची सेवा केली. त्या सेवेचा मेवा हा अनेक पुढाऱ्यांनी खाल्ला. मात्र निवडणूकीनंतर माझा मतांची गरज संपली की ही लोक लगेच मला राजकारणात टार्गेट करतात. मला त्रास देणे हाच जर तुमचा अजेंडा असेल तर निवडणुकीला माझ्या मतांचा वापर कशाला करून घेता माझ्या मतांवर पद उपभोगायची आणि माझ्याविषयी मात्र मनामध्ये तिरस्कार ठेवायचा ही जर निवडणुकीच्या आधीच माहीत असतं तर तालुक्याचे चित्र आज बदललेलं असतं. निवडणुकीच्या आधी जी माणसं वयाने माझ्यापेक्षा मोठे असून पाया पडली ती आज माझे पाय ओढण्यामध्ये दंग आहे यापेक्षा कलियुगाचा वेगळा अर्थ काय असू शकतो.
सर्व पुढारी एका बाजूला मी एका बाजूला असे काहीसे चित्र निर्माण झालेले आहे. मात्र याही कठीण परिस्थितीत खंबीरपणे जनतेच्या पाठीशी त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी कायम लढत राहणार आज मनाला अनेक वेदना होतात. मात्र चेहऱ्यावर ते न आणता या कुटुंबाचा राजकीय वारसा संपन्नपणे पुढेही चालवणार आहे.
यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा चेअरमन मा. सरपंच मीनाताई यादव, तुकाई देवस्थान अध्यक्ष राजेंद्र शेळके, शहांजापूर गावचे सरपंच अण्णा मोटे, रविंद्र पाडळकर, संतोष यादव, सुभाष यादव, रमेश औटी साहेब, संतोष शेळके, जालिंदर तानवडे,