गोठय़ाला आग लागून बळीराजाने गमावला प्राणप्रिय बैल.गोठा आगीत भस्मसात, लाख ते सव्वा लाखाची नुकसान.

WhatsApp

काळवाडी (जांभोरी) येथे दि. 22-8-2025 रोजी दु. चारच्या दरम्यान गोठ्यास अचानक आग लागल्याने गोठा जळुन भस्मसात झाला. गोठ्यात असलेल्या तीन बैला पैकी एक गोठ्यातच गतप्राण झाला व दोन जखमी अवस्थेत ग्रामस्थांना वाचवण्यात यश आले. आदिवासी भागात गोठे घराला लागुनच असतात सुदैवाने सदर गोठा राहत्या घरापासून दूर पडाळीवर होता यामुळे मोठी दुर्घटना टळली. जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु गोठा भस्मसात झाला. तीन पैकी दोन बैलांना वाचविण्यात यश आले असून शेतकरी बबन भोरु भोकटे यांची एक ते सव्वा लाख रुपयांची अर्थिक नुकसान झाली. आगीत मृत झालेला बैलाला त्यांनी खुप चांगले जीव लावुन जपले होते. आंबेगाव तालुक्यात या परिसरात भाद्रपदी पोळा असल्याने बबन भोकटे यांनी आता त्या वेळेस एक सदस्य कमी झाल्याने दु:खात झाले.
या वेळेस पोलीस आधिकारी सावंत साहेब, लगड साहेब, तलाठी विशाल घारे , कोतवाल लक्ष्मीबाई मोरमारे, पशुवैद्यकीय आधिकारी विजय कोंढवळे,डाॅक्टर सचीन भोईर, पोलीस पाटील नवनाथ केंगले, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, माजी सरपंच किसन पारधी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, महादू भोकटे, ज्ञानेश्वर पारधी, पुनाजी पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारूती दादा केंगले व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाकडून जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. शेतकऱ्यास लवकर मदत मिळावी असी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे.भीमाशंकर अतिदुर्गम भागात अतीवृष्टी ,घाटमाथ्यावरील घोंगावणारा वारा आणि वातावरणातील गारठा यामुळे बैलाना थंडी लागू नये यासाठी गोठ्यात छोटी शेकोटी करून ठेवली असल्याचे समजते.

जाहिरात

error: Content is protected !!