ओझरच्या गणरायाच्या दर्शनाला लाखो भाविक.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी) श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर येथे स्वातंत्र्यदिना निम्मित लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन घेतले. पहाटे ठीक ५ वाजता श्रींची महापूजा करून ७९ व्या स्वातंत्र दिनानिम्मित मूर्ती पुढे आकर्षक तिरंगा ध्वजाची मांडणी करण्यात आली होती.सकाळ पासूनच मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. स्वातंत्र दिनानिम्मित श्री क्षेत्र ओझर येथे विविध परिसरातील विद्यालय व शाळांनमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला.यापैकी श्री विघ्नहर विद्यालय ओझर येथील शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व श्री विघ्नहर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षण गणेश राऊत सर यांनी केले. ध्वजाला मानवंदना व ध्वजगीत गायन शालेय विद्यार्थी यांनी केले. विद्यालयातील ध्वजारोहण झाल्या नन्तर शालेय विद्यार्थी यांना श्री मंगलमूर्ती पतसंस्था व विठ्ठल रखुमाई पतसंस्था यांच्या वतीने प्रतीवर्षाप्रमाणे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम भक्तभवन येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे हे होते.शालेय विद्यार्थी यांची भाषणे,बालवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या प्रथम ,द्वितीय ,तृतीय क्रमाक आलेल्या विद्यार्थी यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी सर्वांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे खजीनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त प्रकाश मांडे ,सुर्यकांत रवळे,विनायक मांडे,ओझर गावचे सरपंच राजश्री कवडे,माझी सरपंच मधुरा कवडे ग्रामविकास ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष मांडे,माजी अध्यक्ष शाकुजी कवडे,माजी विश्वस्त गणपत कवडे,ओझर गावचे पोलीस पाटील मोहन कवडे,ग्रामविकास विश्वस्त निलेश टेंभेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अनिकेत रवळे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहण झाल्या नंतर विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगट सर व विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तभवन येथे कार्यक्रम संपन्न झाला.

जाहिरात

error: Content is protected !!