विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी वेळ दिली होती, गेली अनेक वर्ष सातत्याने महाराष्ट्रातील बंद पडत चाललेल्या एक पडदा चित्रपटगृहाच्या समस्या आणि नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग वगळून मराठी चित्रपट दाखविण्याचे धोरण ठरवण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत बैठक घेतली. तसेच स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत मागणी आली असून यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले. तसेच नारायणगाव येथील विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक करण्यासंदर्भात सांस्कृतिक विभागाला प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

नाशिक येथील गेल्या 2008 साल पासून प्रलंबित पडलेले 127 एकर गाय रान जमीन मुंडेगाव तालुका इगतपुरी नाशिक फिल्म सिटी साठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि दादासाहेब फाळके यांचे स्मारक,असे विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या दोन महिन्यांमध्ये हे सर्व विषय मार्गी लागतील आणि पुढील यासंदर्भातील मीटिंग दोन महिन्यानंतर घेऊयात असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांनी दिले.. या बैठकीला पुढील मान्यवर उपस्थित होते
फिल्म सिटी च्या स्वाती म्हसे पाटील ,दुसरे संचालक विभीषण चौरे,राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नितीन धवणे ,सिंगल थिएटर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर मराठी डिस्ट्रीब्यूटर चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे दिग्दर्शक, हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!