गांजा विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली अटक.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी)
येथील नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावर सापळा लावून अटक केली आहे असून आरोपीकडून १० किलो २७५ ग्रॅम गांजा व मोटार सायकल असा एकूण १ लाख ३२ बत्तीस हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
या प्रकरणी मुनवर अली सय्यद (वय ४८ रा.कोतुळ ता.अकोले ) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
.पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सहाय्यक फौजदार दिपक साबळे, हवालदार संदीप वारे,अक्षय नवले,राजु मोमीन,नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार मंगेश लोखंडे, फौजदार सोमशेखर शेटे,दडस पाटील, सोमनाथ डोके, सत्यम केळकर हे आरोपीच्या मागावर होते. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या मोटर सायकलवर बांधलेल्या गोणीची तपासणी केली. या वेळी गोणी मध्ये १ लाख २५ हजार रूपये किमतीचा १० किलो २७५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पुढील तपास साठी आरोपीला नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!